Saturday, September 12, 2026
Homeआरमोरीआरमोरीच्या तरुणाचा तरुणीवर अत्याचार…-तरुणावर गुन्हा दाखल…

आरमोरीच्या तरुणाचा तरुणीवर अत्याचार…-तरुणावर गुन्हा दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली) :-लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीवर अत्याचार केल्याचे प्रकरण आरमोरी येथे समोर आले आहे.हा प्रकार मागील दीड वर्षांपासून सुरू असल्याचे उघड झाले आहे.जेव्हा या तरुणाने लग्नाला नकार दिला.तेव्हा या पीडित तरुणीने आरमोरी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली असून,आरोपी फरार आहे.शुभम बबन सोरते वय २७ वर्षे रा.आरमोरी-बर्डी जि.गडचिरोली असे फरार आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी शुभमची मागील दीड वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून लगतच्या जिल्ह्यातील एका तालुक्यातील २१ वर्षीय तरुणीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये होऊन नंतर प्रेम जुळले.

यातूनच त्यांच्यात सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीची २०२३ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती.२०२३ पासून ते मे २०२४ पर्यंत सुरू असलेल्या प्रेमा दरम्यान त्यांनी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते.तत्पूर्वी या दोघांनी प्रेमाच्या व लग्नाच्या आणाभाकासुद्धा खाल्ल्या.मे २०२४ नंतर सदर तरुणी ही २१ वर्षांची होताच फिर्यादी तरुणीने लग्न करण्यासाठी शुभम सोरते याच्याकडे आग्रह धरला.मात्र,शुभमने लग्नाला नकार दिला.सदर तरुणीने दोनदा तडजोडीअंती दोन्ही घरच्यांच्या मंडळींची सभा लावली.मात्र,शुभमचा लग्नाला विरोध कायम होता.पीडित तरुणीने २४ जुलैला आरमोरी पोलिस स्टेशन गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून आरमोरी पोलिसांनी आरोपी शुभम सोरते याच्या विरोधात भादंवी कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी फरार असून,आरमोरी पोलिसांद्वारे त्याचा शोध सुरू आहे.अधिक तपास ठाणेदार विनोद रहांगडाले यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक संगीता मसराम करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!