Wednesday, September 23, 2026
Homeलाखांदूरघराची स्लॅब व भिंत अंगावर पडून २५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू…-देसाईगंज-हेटी येथील...

घराची स्लॅब व भिंत अंगावर पडून २५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू…-देसाईगंज-हेटी येथील युवक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

लाखांदूर(भंडारा):-मोकडळीस आलेले घर आणि स्लॅबचे छत व्हायब्रेटर मशीनने पाडण्याचे काम सुरू असतानाच छत अंगावर कोसळून २५ वर्षीय मजुराचा दबून मृत्यू झाल्याची घटना काल,२५ जुलैच्या दुपारी  लाखांदूर तालुक्यातील सोनी गावात घडली.प्रफुल प्यारेलाल रामटेके वय २५ वर्षे, रा.हेटी,देसाईगंज (वडसा),जि.गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे. अवघ्या २५ वर्षीय युवकाचा घराचे स्लॅब पाडत असताना भिंत अंगावर पडून मृत्यू झाल्याची घटना सोनी येथे पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.

सोनी येथील प्रियकांता गोपीचंद बावणे यांचे घर जीर्ण झाल्याने पावसाळ्यात केव्हाही कोसळण्याची शक्यता होती.त्यामुळे त्यांनी ते पाडण्यासाठी मजुरांना काम दिले होते.यासाठी व्हायब्रेटर मशीनच्या साहाय्याने घर पाडण्यासाठी देसाईगंज(वडसा)-हेटी येथील प्रफुल प्यारेलाल रामटेके याला पाचारण केले होते.हाताला मिळेल ती मजुरी करून प्रपंच चालविणाऱ्या प्रफुल्लला हे काम मिळाल्याने त्याने एका व्यावसायिकाकडून विजेवर चालणारी घर पाडण्याची व्हायब्रेटर मशीन भाड्याने आणली होती.सोबत मदतनीस म्हणून एकाला कामावर घेतले होते.

सकाळपासून काम सुरू होते.दरम्यान,व्हायब्रेटर मशीनने घराचे स्लॅब पाडत असताना मदतनीस युवक काही कामानिमित्त बाहेर गेला.काम लवकर संपावे यासाठी प्रफुल्लने व्हायब्रेटर मशीनच्या सहाय्याने घराचे छत पाडण्याचे काम सुरू ठेवले.मात्र,घर जीर्ण झाले असल्याने घराची स्लॅब व भिंत अंगावर पडून प्रफुलचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती कळताच लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार गोपाल कोसरे,नायक संदिप बावनकुळे,अंमलदार राहुल कोटांगले यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह शवविच्छेदनासाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन केला.या घटनेची माहिती स्थानिक सोनी येथील तलाठी आशिष खामनकर,ग्रामसेवक विलास मुंढे, कोतवाल मंगेश सुखदेवे व सरपंचा कुंता शहारे यासह अन्य ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!