Wednesday, September 23, 2026
Homeलाखांदूररोजगार हमीचे काम करतांना मजुराला आली भोवळ..-  उपचारा पूर्वीच मजुराचा आकस्मिक मृत्यू…

रोजगार हमीचे काम करतांना मजुराला आली भोवळ..-  उपचारा पूर्वीच मजुराचा आकस्मिक मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

लाखांदूर(भंडारा) :- रोजगार हमी योजने अंतर्गत शेत शिवारात मातीकाम करीत असलेल्या एका मजुराचा मृत्यू झाला.ही घटना काल,१९ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील सोनेगाव शेत शिवारात घडली.रामचंद्र सखाराम ब्राह्मणकर वय ५६ वर्षे असे मृत मजुराचे नाव आहे.

लाखांदूर तालुक्यातील सोनेगाव ग्रामपंचायत क्षेत्रात मागील काही दिवसांपासून शासनाच्या मग्रारोहयोच्या अकुशल कामांतर्गत शेतशिवारात मातीकाम सुरू करण्यात आले आहे.या माती कामावर रामचंद्र स्वतःच्या कुटुंबीयांसह नियमित मजूर म्हणून काम करीत आहे.रविवारला रामचंद्र सकाळच्या सुमारास  काम करीत असतानाच अचानक रामचंद्रला भोवळ आली व तो जमिनीवर कोसळला.यावेळी रामचंद्रच्या कुटुंबीयांसह शेतशिवारात उपस्थित अन्य मजुरांनी रामचंद्रला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात  हलविले.डॉक्टरांनी उपचारा पूर्वीच रामचंद्रला मृत घोषित केले.

मजुराचा आकस्मिक मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक सोनेगाव ग्रामपंचायतचे सरपंच नरेश कठाणे, ग्रामसेवक लांजेवार,रोजगार सेवक नाहोकर यांच्यासह लाखांदूर पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना विभागाच्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांना होताच सर्वांनी मृतकाच्या घरी भेट दिली.यावेळी कुटुंबीयांना मजुराच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याबाबत सांगितले.मात्र, कुटुंबीयांनी शवविच्छेदन करण्याला विरोध केला.परिणामी,मृत्यूचे कारण कळले नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!