Tuesday, June 23, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील विसाव्या सत्रात डॉ.चंद्रकांत लेनगुरे व जयराम घोंगडे विजयी…

गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील विसाव्या सत्रात डॉ.चंद्रकांत लेनगुरे व जयराम घोंगडे विजयी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 

या उपक्रमाचे विसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २५ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून स्पर्धेचे विसावे सत्र असल्याने यावेळी दोन कवींना सन्मानित करण्यात आले आहे.त्यात गडचिरोली येथील प्रसिद्ध कवी डॉ.चंद्रकांत लेनगुरे व नांदेड येथील प्रसिद्ध गझलकार जयराम घोंगडे या दोन कवींची आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून निवड करण्यात आली असून त्यांच्या अनु.”मायबोली माझी” व “आई ‘विसी ” या कवितांची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

डॉ.चंद्रकांत लेनगुरे हे गडचिरोली येथील प्रसिद्ध कवी असून ते झाडीबोली शाखा गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष आहेत.नुकत्याच मौजा-खडकी (बामणी) जिल्हा- गोंदिया येथे झालेल्या एकतिसाव्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.विविध संस्थातर्फे अनेक पुरस्काराने ते सन्मानित आहेत.आजवर त्यांचे तीन कवितासंग्रह,एक चारोळी संग्रह व एक कथागितसंग्रह प्रकाशित झाले आहेत.तर जयराम घोंगडे हे नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी व गझलकार आहेत.आजवर त्यांचे ४ कविता संग्रह व एक गझलसंग्रह प्रकाशित झाले असून अनेक पुस्तके प्रकाशनाचे मार्गावर आहेत.त्यांनी विविध विषयांवर विपुल साहित्य लेखन केलेले आहे.अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.या दोन दिग्गज साहित्यिकांना नाट्यश्रीच्या स्पर्धेत एकाच वेळी पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

त्यांच्या यशाबद्दल नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.विसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने गणेश रामदास निकम,वंदना सोरते,रेखा दिक्षित,मुर्लीधर खोटेले,जयराम घोंगडे,प्रभाकर दुर्गे,सुजाता अवचट, सुरज गोरंतवार,तुळशीराम उंदीरवाडे,नरेंद्र गुंडेली, पी.डी.काटकर,विलास जेंगठे,गजानन गेडाम,संतोष कपाले,सत्तू भांडेकर,प्रेमिला अलोने,चरणदास वैरागडे, पुरुषोत्तम दहिकर, डॉ.मंदा पडवेकर,भिमानंद मेश्राम, पुरुषोत्तम ठाकरे,पुरुषोत्तम लेनगुरे,डॉ.चंद्रकांत लेनगुरे, मंदाकिनी चरडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

या पुरस्कारांचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे .  

    – चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!