Monday, September 7, 2026
Homeगोंदियापोस्टामधील १८ ग्राहकांचे सहा लाख रुपये हडपणाऱ्या डाकपालास पोलीस कोठडी…

पोस्टामधील १८ ग्राहकांचे सहा लाख रुपये हडपणाऱ्या डाकपालास पोलीस कोठडी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- दोन पैसे व्याज मिळेल या अपेक्षेपोटी पोस्टामध्ये पैसे ठेवणाऱ्या १८ ग्राहकांचे सहा लाख रुपये हडपणाऱ्या डाकपालावर १७ मे रोजी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.त्याला दोन दिवसांपूर्वी शहर पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आज सोमवारपर्यंत (दि.२०) पोलिस कोठडी सुनावली आहे.गोंदिया खुर्द येथे पोस्टाचे डाकघर आहे.या शाखेत आरोपी नितीन सदाराम राऊत वय २८ वर्षे, रा.डोंगरगाव हा कार्यरत असता त्याने १२ मे २०२० ते ७ जानेवारी २०२३ या काळात १८ ग्राहकांचे सहा लाख दोन हजार रुपये शासकीय हिशेबात जमा न करता त्या पैशांची अफरातफर केली होती.या घटने संदर्भात डाक विभागाचे उप अधीक्षक आशिष बन्सोड वय ४१ वर्षे रा. समता कॉलनी,ब्रह्मपुरी  यांच्या तक्रारीवरून १७ मे रोजी शहर पोलिसांनी भादंवि कलम ४०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.त्या अफरातफर करणाऱ्या डाकपाल नितीन राऊत याला शहर पोलिसांनी दोन दिवसांनी मुंबईच्या कुलाबा येथून अटक केली.त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला आज सोमवारपर्यंत (दि.२० मे) पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा,उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनात शहर ठाणेदार चंद्रकांत सूर्यवंशी, उपनिरीक्षक मंगेश वानखडे, हवालदार दीपक राहांगडाले, श्यामकुमार कोरे, शिपाई कुणाल बारेवार, भांडारकर यांनी केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश वानखडे करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!