- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-गेली चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडीचा वाढलेला जोर कमी वाटू लागला होता.ढगाळ वातावरणामुळे जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.अशातच आज शनिवारी विदर्भातील नागरिकांना सध्या ‘हिवसाळ्या’ चा अनुभव येऊ लागला आहे. हिवाळ्यात थंडीसह पावसानेही हजेरी लावल्याने पावसाळा सुरू झाला की काय? अशी गंमतीशीर चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगू लागली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात संध्याकाळच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या तर काही भागात अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.काही ठिकाणी तर नुसतीच पावसाची सर येऊन गेली. देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावात रस्ते जलमय होण्याइतका पाऊस कोसळला.सदर कोसळणारा पाऊस हा फेंगल चक्रीवादळाचा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे.
- Advertisement -

