Friday, June 19, 2026
Homeनागपूरखेळता-खेळता चार वर्षीय चिमुकला पाण्याच्या टाकीत पडला अन् अनर्थ घडला... - आई-वडिलांच्या...

खेळता-खेळता चार वर्षीय चिमुकला पाण्याच्या टाकीत पडला अन् अनर्थ घडला… – आई-वडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :- या दुनियेत आपल्या मुलांवर आई-वडीलांइतके जीवापाड प्रेम करणारे कुणीही नाही.मुले कितीही मोठी झाली; तरीही ती आई-वडिलांसाठी लहानच असतात.मात्र,एखादेवेळी जीवाचे काळीज असणारी मुले दिसेनाशी झाली तर…पायाखालची वाळूच सरकली जाते.असाच प्रकार नागपूर जिल्ह्यात नुकताच उघडकीस आला आहे.
अंकुर सीड्समध्ये कामाला असलेले दाम्पत्य सकाळीच उठले.घरची कामे आटोपत असतांना त्यांचा दीड वर्षाचा चिमुकला घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाक्यात पडला.चिमुकला दिसत नसल्याचे पाहून आईवडिलांनी शोधाशोध केली. आपल्या चिमुकल्याला पाण्याच्या टाक्यातून बाहेर काढून मेडिकलमध्ये नेले,परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले अन् आईवडिलांच्या पायाखालील वाळू सरकली. ही घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेरी मानकर-किन्ही गावाजवळ असलेल्या अंकुर सीड्स कंपनीच्या वसाहतीत काल शनिवारी सकाळी ६:३० वाजता घडली.यादी जितेन नान्हे (दीड वर्ष) असे पाण्याच्या टाक्यात पडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.त्याचे वडील जितेन गुलबचंद नान्हे वय २८ वर्षे हे किन्ही गावात असलेल्या अंकुर सीड्स कंपनीत कामाला आहेत.कंपनीच्या कारखान्याशेजारी असलेल्या क्वार्टरमध्ये ते पत्नी,चार वर्षांचा मुलगा चिमुकल्या यादीसोबत राहत होते.नेहमी प्रमाणे कामाला जाण्यासाठी नान्हे दाम्पत्य सकाळीच उठले.त्यांचा दीड वर्षाचा चिमुकला यादीही आईवडिलांसोबत उठला.आईवडील घरची कामे आटोपत असतांना यादी खेळत-खेळत घराशेजारी असलेल्या दोन फूट खोल पाण्याच्या टाक्यात पडला.आईवडिलांनी आपल्या चिमुकल्याचा शोध घेतल्यानंतर तो पाण्याच्या टाक्यात पडलेला दिसला.त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला पाण्याच्या बाहेर काढले.तातडीने त्यांनी आपल्या चिमुकल्याला उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये नेले,परंतु तेथे डॉक्टरांनी तपासून त्या चिमुकल्याला मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली.या प्रकरणी मिळालेल्या वैद्यकीय सूचनेवरून हिंगणा ठाण्याचे हवालदार विजय कळसकर यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.काही वेळापूर्वीच आपल्या समोर खेळत असलेला आपला चिमुकला आपल्याला सोडून गेल्याचे पाहून त्याच्या आईवडिलांच्या पायाखालची वाळू सरकून रुग्णालयात टाहो फोडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!