Sunday, May 3, 2026
Homeभंडारारेती भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर पडल्याने तरुणाचा करून अंत..

रेती भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर पडल्याने तरुणाचा करून अंत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात धक्कादायक घटना काल रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.हायड्रोलिक पद्धतीच्या रेतीच्या ट्रालीचा नट कसत असतांना ट्रालीच अंगावर पडल्याने ट्रालीखाली दबून तरुण मजुराचा जागीच करुण अंत झाल्याची घटना रविवारी सकाळी ९:१५ वाजताच्या सुमारास घडली.लोकेश भाकरू बुद्धे वय २७ वर्षे,रा.बेटाळा, ता.मोहाडी असे मृताचे नाव आहे.
माहितीनुसार,लोकेश हा वैनगंगा येथील बेटाळा रेती घाटावर ट्रॅक्टरमध्ये रेती भरण्यासाठी गेला होता. नदीपात्रातील ट्रॅक्टरमध्ये पूर्णपणे रेती भरून झाली. यावेळी हायड्रोलिकमधून ऑइल येत होते.त्यामुळे लोकेशने हायड्रोलिक वर केले.ऑइल कुठून लिकेज होत आहे,हे बघायला तो गेला.हायड्रोलिक बघितल्यावर तेथील लोखंडी नट पाणाने कसायला सुरुवात केली.नट कसत असतांना हायड्रोलिकची ट्रॉली अकस्मात खाली कोसळली.यात ट्रॉलीच्या खालच्या भागात तो पूर्णपणे सापडला. हायड्रोलिकच्या जागेवर त्याची मान व खांदा सापडला गेल्याने त्याला तेथून निघता न आल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.घटनेची माहिती होताच मोहाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले.ट्रॅक्टरमध्ये सापडलेल्या लोकेश बुधे याला बाहेर काढण्यात आले.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.शवविच्छेदनानंतर काल रविवारी सायंकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोकेशच्या आई-वडिलांचे यापूर्वीच निधन झाले होते.तो स्वतः अविवाहित होता.त्याला एक मोठा भाऊ आहे.तो ग्रामपंचायतमध्ये रोजगार सेवक म्हणून काम करतो.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक 'मचान गणना' उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!