Thursday, October 1, 2026
Homeभंडाराभरधाव वेगातील रेतीने भरलेला ट्रॅक्टर उलटला अन् तरणेबांड पोरगा दगावला..!

भरधाव वेगातील रेतीने भरलेला ट्रॅक्टर उलटला अन् तरणेबांड पोरगा दगावला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-ट्रॅक्टरमध्ये रेती भरून रेतीची साठवणूक करण्यासाठी भरधाव वेगात निघालेला रेतीने भरलेला ट्रॅक्टर उलटला आणि चालत्या ट्रॅक्टरवरून खाली कोसळलेल्या चालकाच्या अंगावरून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक गेल्याने २६ वर्षीय तरणेबांड पोराचा जीव गेल्याची घटना आज,रविवार २६ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील ईटान वाळू घाटावर घडली.सचिन सौंदरकर वय २६ वर्षे, रा.ईटान,ता.लाखांदूर, जि.भंडारा असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
लाखांदूर तालुक्याच्या ईटान रेती घाटावर रेती साठवणुकीचे काम सुरू आहे.यासाठी आज रविवारी सकाळच्या सुमारास रेती घाटातून रेती भरलेला ट्रॅक्टर  सचिन सौंदरकर नेत असतांनाच वाटेतच त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले.यामुळे सचिन हा चालत्या ट्रॅक्टरवरून खाली कोसळला.खाली कोसळताच धावत्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक त्याच्या अंगावरून गेले. ट्रॉलीखाली दबल्याने यातच त्याचा मृत्यू झाला.अपघात घडताच उपस्थित कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र,तोपर्यंत खूप उशीर झाला होता.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर उद्या होणारा व्यापारी संघटनांचा ‘नो यूपीआय डे’ मागे..!

उद्रेक न्युज वृत्त :-यूपीआय व्यवहारांवर मर्चेंट डिस्काउंट रेट(MDR)लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या प्रस्तावित निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.या निर्णयाचा तीव्र निषेध...

उपविभागीय अभियंता बाळू षटगोपनवार यांचा निरोप समारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंदेवाहीचे उपविभागीय अभियंता बाळू जगन्नाथ षटगोपनवार यांच्या सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ आज गुरुवारी उत्साहात पार पडला.यावेळी षटगोपनवार यांचा...

गडचिरोलीत गर्भाशयमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी एचपीव्ही लसीकरण; १ हजार २५४ किशोरवयीन मुलींना दिली लस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी गडचिरोली जिल्ह्यात शंभर टक्के एचपीव्ही लसीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आदिवासी व...

आजपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या ‘या’ प्रवाशांना एक ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा कडक निर्णय घेत 'आरक्षित' केलेल्या तिकिटांवर किंवा 'ई-पास'वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज,गुरुवार १ ऑक्टोंबरपासून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!