Sunday, May 3, 2026
Homeमुंबईअंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी दर्जा देऊन कायम करण्याचा ठराव...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी दर्जा देऊन कायम करण्याचा ठराव…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-गुजरात मधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारीचा दर्जा द्यावा,असा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने दिला आहे.त्याच धर्तीवर इतर राज्यातील सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी दर्जा देऊन कायम करावे,असा ठराव मंजूर करुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करावी,अशी मागणी दिल्ली येथील अखिल भारतीय अंगणवाडी सेविका मदतनीस फेडरेशनच्या (सीटू) राष्ट्रीय परिषदेत करण्यात आली.
तालकटोरा स्टेडियम येथे झालेल्या परिषदेत २५ राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी झाले होते.राष्ट्रीय सेक्रेटरी तपन सेन यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले.कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर होईपर्यत लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
फेडरेशनच्या सदस्या संगिता कांबळे यांनी सांगितले की,केरळ खासदार जॉन ब्रिटास,व्ही शीवदासन ए.के. रहीम यांनी अंगनवाडी सेविकांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले.यावेळी अर्थतज्ञ व जेएनयू प्रा.उत्सा पटनाईक,गुजरात उच्च न्यायालयात अंगणवाडी सेविका,मदतनीस यांची बाजु भक्कमपणे मांडणारे जेष्ठ कायदेतज्ञ,वकील तसेच ऑल इंडिया वकील संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस ॲड.सुरेंद्रनाथ यांनी मार्गदर्शन केले.राष्ट्रीय अध्यक्षा उषा राणी यांनी यावेळी प्रास्ताविक केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक 'मचान गणना' उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद...

एसीचा स्फोट; ९ जणांचा होरपळून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राजधानीत आज,रविवार ३ मे रोजी पहाटेच्या सुमारास एका निवासी इमारतीत भीषण आगीची घटना उघडकीस आली असून भीषण आगीत तब्बल ९...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!