- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सुरुवातीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभासाठी अनेक महिलांनी अर्ज केला.त्यानुसार शासनाकडून लाभही देण्यात आला.अशातच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थ्यांना लाभ सोडण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.आतापर्यंत साडे पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत.दरम्यान,सरकारकडून आता नवे नियम लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेचा हफ्ता आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला दिला जाणार आहे.तर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही.याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लाडक्या बहिणींना योजनेचा हफ्ता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दिला जाणार आहे.मात्र लाडक्या बहिणींचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्याच लाभ मिळणार नाही.ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासले जाणार आहे.दरवर्षी जून महिन्यात ई केवायसी करावी लागणार आहे.उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे.
काय आहेत नवे नियम👇
१.अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही
२.दरवर्षी जून ते जुलै मध्ये ई केवायसी करणे अनिवार्य
३.लाभार्थी हयात आहे की नाही याचीही तपासणी होणार
४.लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासण्यात येणार
५.जिल्हा स्तरावरून फेरतपासणी करून त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे.
- Advertisement -

