Friday, August 7, 2026
Homeनागपूरसव्वा महिन्याच्या चिमुकलीचे मातृछत्र हरपले.. - नैराश्यातून आईची आत्महत्या..

सव्वा महिन्याच्या चिमुकलीचे मातृछत्र हरपले.. – नैराश्यातून आईची आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सव्वा महिन्याची चिमुकली आपले दूध पित नसल्याने आईने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वश्रीनगर येथे घडली.भाग्यश्री राजेश वानखेडे वय २४ वर्षे असे  मृत महिलेचे नाव आहे.माहितीनुसार,भाग्यश्रीचे पती राजेश कुशनचे काम करतात.चार वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले.कुटुंब सर्वश्रीनगर येथील एका भाड्याच्या घरात राहतात.अलीकडे त्यांना मुलगी झाल्याने आनंदाचे वातावरण होते.मात्र,चिमुकलीने अचानक दूध पिणे बंद केल्याने भाग्यश्री चिंतेत होती.गोंडस मुलगी अंगावरचे दूध पित नाही,अशी तक्रार तिने पतीकडे केली. औषधोपचारानंतर सर्व काही ठीक होईल,असे म्हणून पतीने तिची समजूत घातली.परंतु मुलगी दूध पित नसल्याने कुंदावरील मानसिक तणाव वाढत गेला. तिच्यावरील तणाव वाढताना पाहून पतीने तिला मोठ्या बहिणीकडे जाण्याचा सल्ला दिला.पतीने तिला काही दिवस लाखांदूर येथील मोठ्या बहिणीकडे देखील पाठवले.मात्र त्याचा फार उपयोग झाला नाही. नुकतीच घरी परत आल्यानंतर तिने विष प्राशन केले. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले मात्र तिचा मृत्यू झाला.सव्वा महिन्याच्या चिमुकलीचे मातृछत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!