Monday, September 21, 2026
Homeनागपूरक्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर परिसरात उघडकीस आली.अदिती मोरेश्वर चौखंडे असे मृतक क्रिकेटपटू तरुणीचे नाव असून ती मूळची अकोला येथील रहिवासी होती.क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती २ वर्षांपासून तिच्या आईसोबत नागपुरात वास्तव्यास होती.अश्यातच ३ महिन्यांपूर्वीच चौखंडे कुटुंब लक्ष्मीनगर येथील उमालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहायला आले होते.तिचे वडील कंत्राटदार असून तिचा भाऊ क्रिकेटर आहे.क्रिकेटमध्ये कारकीर्द घडविण्याच्या उद्देशाने अदितीने नागपुरातील सुर्वे क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण सुरू केले होते.अलीकडेच विदर्भक्रिकेट असोसिएशनच्या निवड चाचण्या झाल्या. मात्र,अंतिम निवडीत तिचे नाव नसल्याने ती मानसिक तणावाखाली गेली.घटनेच्या दिवशी म्हणजेच काल गुरुवारच्या सकाळी अदितीची आई तिला झोपेतून जागे करण्यासाठी गेली असता,ती खोलीतील दार उघडत नसल्याने जोर-जोराने ओरडू लागली.दरम्यान,शेजाऱ्यांनी धाव घेत दार उघडुन बघीतले असता अदिती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली.लागलीच शेजाऱ्यांच्या मदतीने तिला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेले.मात्र,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पंचनामा करत असतांनाच घटनास्थळावर पोलिसांना अदितीने लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली.त्यात, तिने आई-वडिलांची माफी मागितली आणि क्रिकेटर असलेल्या भावाला उद्देशून लिहिले, ‘तुझी निवड झाली आहे.तू चांगला खेळ…आई-बाबांचे नाव मोठे कर.’ अशा भावनिक शब्दांनी लिहिलेल्या चिठ्ठीतील शब्द कानावर पडताच अनेकांचे डोळे भरून आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!