Wednesday, October 14, 2026
Homeनागपूरसरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. - कंत्राटदार आक्रमक..

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त झालेल्या कंत्राटदारांनी एकत्र होत निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे.त्यानुसार,येत्या १८ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत धरणे देण्यात येणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग,आदिवासी विभाग,जिल्हा परिषद, जलसंपदा,नगरविकास,महसूल अशा विविध विभागांतील बांधकामांचे सुमारे ९० हजार कोटी रुपये थकबाकी असल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनने केला आहे.सर्व विभागांच्या मागण्या एकाचवेळी केल्याने सरकार व विभागांकडून विविध कारणे समोर करून टोलवाटोलवी करण्यात येते.सदरची बाब लक्षात घेता फेडरेशनने स्ट्रॅटेजीत बदल केला आहे. जलजीवन मिशन कंत्राटदारांच्यावतीने येत्या,१० ऑगस्ट रोजी नागपूरच्या संविधान चौकात धरणे देण्यात येणार आहे,यानंतर मुख्यमंत्री कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.मुंबईतील आंदोलनात सर्वात आधी आदिवासी विभागाकडे असलेल्या सुमारे १० हजार कोटी रुपयांची थकबाकी तात्काळ मिळावी,ही मागणी रेटण्यात येणार आहे.यानंतर टप्प्याटप्प्याने एकेका विभागाची मागणी करण्यात येईल.आंदोलनात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कंत्राटदार सहभागी होणार असल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले आहे.मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलन तीव करण्यात येईल आणि पुढील टप्प्यात राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे.आदिवासी विकास विभागाकडे दोन वर्षांपासून थकबाकी आहे.१२ हजार कोटी रुपयांपैकी २ हजार कोटी रुपये दिले. यंदा फक्त ८०० कोटी रुपये तरतूद केली,याच प्रमाणात तरतूद राहिल्यास दहा वर्षे कामांचे पैसे मिळणार नाहीत,कंत्राटदार कर्जबाजारी झाले आहे.काहींची घरे गहाण आहेत.त्यामुळे सरकारने सरसकट थकबाकी द्यावी,अशी मागणी फेडरेशनचे उपाध्यक्ष किसन पानसरे यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर सिंदेवाहीच्या राज्य महामार्गावर गतीरोधक बसविण्यास सुरुवात.. -अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-९ वरील रस्ता सुरक्षेचा मुद्दा...

संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. -पाच तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये भूजल पातळी घसरली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन,पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना गती द्यावी.भूजल पातळी घसरलेल्या संवेदनशील...

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत धान्य वितरणासाठी विशेष नियोजन.. -स्थलांतरितांना इतर ठिकाणच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.शेतीवर अवलंबून असणारे...

‘यूपिआय’ वापरकर्त्यांसाठी दिलासा; शुल्क आकारणी पुढे ढकलली..

उद्रेक न्युज वृत्त :-येत्या,गुरुवार १५ ऑक्टोंबर २०२६ पासून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र 'पर्सन टू मर्चंट' व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर म्हणजेच 'मर्चेंट डिस्काउंट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!