- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर घडली असून आज रविवारी सर्वत्र उघडकीस आली. नावेद(नवल)होलाराम खंडाते वय १८ वर्षे,रा.रोंघा असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळाच्या बारावीचा काल शनिवारी निकाल जाहीर झाला.यात नावेद हा परीक्षेत नापास झाला.यामुळे तो मानसिक तणावात गेला.परीक्षेत नापास झाल्याची खंत उराशी बाळगून त्याने दुपारीच शेत गाठले आणि शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.गोबरवाही पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.विशेष म्हणजे,विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द,चिकाटी आणि मेहनतीची आवश्यकता असते. शिक्षण म्हणजे संपूर्ण आयुष्य नव्हे,तर यशाचा केवळ एक मार्ग आहे.अपयशावर मात करून यशस्वी व्यावसायिक किंवा मोठ्या हुद्द्यावर पोहोचलेली अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यामुळे,आत्महत्या हा कोणत्याही संकटावरचा पर्याय वा उत्तर असूच शकत नाही.आठवी नापास विद्यार्थी पुढे शिकून आयपीएस अधिकारी बनतो,तर जिंकणे व हरणे हा जीवनातील नित्याचाच क्रम ठरवून पुढील भवितव्य घडवणे गरजेचे आहे.
- Advertisement -

