Friday, June 19, 2026
Homeभंडाराभंडारा दौऱ्याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची बोट वैनगंगा नदीत उलटली..

भंडारा दौऱ्याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची बोट वैनगंगा नदीत उलटली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची बोट वैनगंगा नदीत उलटल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली.मात्र,वेळीच मदत मिळाल्याने या घटनेत कोणतीही जीवितहाणी झाली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज,सोमवारी भंडारा जिल्ह्याच्या दोऱ्यावर होते.या दौऱ्यात ते वैनगंगा नदीवर होणाऱ्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्याचे टप्प्याचे भूमिपूजन करणार होते.यासाठी मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या दौऱ्याच्या वार्तांकनासाठी आलेले पत्रकार २ स्वतंत्र बोटीतून नदीपात्रात जाऊन आढावा घेत होते.यावेळी पत्रकार मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ व फोटो काढण्यासाठी बोटीच्या एका बाजूला आले आणि काही कळण्याच्या आतच त्यांची बोट नदीपात्रात कलंडली.या अनपेक्षित घटनेमुळे सर्वचजण घाबरले.

पण यावेळी तिथे असणाऱ्या इतर बोटी तात्काळ बचावकार्यासाठी आल्यामुळे सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हा प्रकार पाहून आपल्या बोटीसह मदतकार्यासाठी पोहोचले.या घटनेत काही कॅमेरामन्सचे कॅमेरे पाण्याच्या संपर्कात आले.त्यात त्यांचे जबर नुकसान झाले.हे वगळता इतर दुसरी कोणतीही हानी झाली नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!