Saturday, August 29, 2026
Homeगडचिरोली४३ वर्षीय उपसरपंचास ठोठावली ५ हजार रुपयांच्या द्रव्यदंडाची शिक्षा…-गावातील महिलेशी फोनवर अश्लील...

४३ वर्षीय उपसरपंचास ठोठावली ५ हजार रुपयांच्या द्रव्यदंडाची शिक्षा…-गावातील महिलेशी फोनवर अश्लील बोलून पाठवीत होता मॅसेज…-सिरोंचा तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गावातील महिलेशी नेहमी फोनवर अश्लील बोलून तिला मॅसेज पाठविणाऱ्या एका उपसरपंचास अहेरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ हजार रुपयांच्या द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे.धर्मय्या किष्टय्या वडलाकोंडा वय ४३ वर्षे,रा.असरअली,ता.सिरोंचा असे शिक्षा झालेल्या दोषी उपसरपंचाचे नाव आहे.धर्मय्या वडलाकोंडा हा नेहमी पीडित महिलेच्या घरी जायचा.शिवाय तिच्याशी फोनवर अश्लिल संभाषण करुन तिला अश्लिल मेसेजेसही पाठवायचा.धर्मय्याचे हे कृत्य न आवडल्याने महिलेने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली.त्यानंतर पतीने धर्मय्याच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला.मात्र,धर्मय्याने शिवीगाळ

करुन ‘तुला काय करायचे ते करुन घे’,असे धमकावले. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर धर्मय्याच्या पत्नीने पीडित महिलेच्या घरी जाऊन तिच्या पतीला पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली.त्यामुळे पीडित महिलेने धर्मय्याविरुद्ध कायदेशिर तक्रार केली. त्यानुसार असरअली पोलिसांनी संशयीत आरोपी

धर्मय्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.त्यानंतर तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी पवार व गजानन राठोड यांनी अहेरीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात संशयीत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

२१ जूनला या प्रकरणाचा निकाल लागला.न्यायालयाने फिर्यार्दी व साक्षदारांचा पुरावा आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी धर्मय्या वडलाकोंडा यास ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. शिवाय यापुढील तीन वर्षे असे कृत्य करणार नाही; असे हमीपत्रही लिहून घेतले.सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!