Tuesday, July 21, 2026
Homeदेसाईगंजनागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार पावसाचा नवा अंदाज वर्तवला होता.त्यानुसार,राज्यातील अनेक भागांमध्ये कमी-अधिक पावसाचा जोर दिसून येत आहे.विशेष म्हणजे,पाऊस हा कुणाच्या हातचा नाही; ही नैसर्गिक बाब आहे.त्यामुळे जिकडे बरसला तिकडे धुमाकूळ घालून सोडतो,तर काही ठिकाणी “रिमझिम गिरे सावन सुलग-सुलग जाये मन” अश्या गीताप्रमाणे पावसाची कथा आहे.अश्यातच आज,मंगळवार २१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यंत्रणेकडून विदर्भातील चार जिल्ह्यांसाठी पावसाची पूर्व चेतावणी देण्यात आली आहे.त्यात पुढील २४ तासांत भंडारा,चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या चार जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.अतिवृष्टीमध्ये पाऊस मुसळधार आणि धो-धो बरसू लागतो.यामुळे घरांची पडझड,रस्ते जलमय होऊन खड्डा की रस्ता वा इतर घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!