उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.येथील पवनी तालुक्यातील सोनेगाव स्मशानभूमीजवळ आज मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटल्याची घटना घडली आहे.या वाहनात २७ मजूर होते.वाहन अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.अपघातात १४ मजूर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.यामधील दोन जण गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.जखमींना उपचारासाठी भंडारा येथील रुग्णायात दाखल करण्यात आले आहे.
जखमी मजूर हे अड्याळजवळील नेरला येथील असून सोनेगाव येथे धान कापणीला जात होते.जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान कापणी धडाक्यात सुरू आहे. शेतकरी ट्रॅक्टर व मजुरांच्या सहाय्याने धान कापणी उरकून घेत आहेत.धान कापणीला मजूर मिळत नसल्याने दूरवरून वाहनाने मजूर बोलावून शेतीची कामे उरकून घेत आहेत.अड्याळ जवळील नेरला येथील २७ मजूर हे धान कापणीसाठी वाहनाने नेरला येथून सोनेगाव येथे जात असताना सोनेगाव स्मशानभूमीजवळ वाहनचालक-मालक महेंद्र मुरकुटे रा.नेरला याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन एका शेताच्या बांधावर उलटले.त्यात वाहनातील २७ मजूर जखमी झाले.

