Tuesday, September 22, 2026
Homeभंडाराअनियंत्रित वाहनाचा भीषण अपघात; धान कापणीला जात होते २७ मजूर..

अनियंत्रित वाहनाचा भीषण अपघात; धान कापणीला जात होते २७ मजूर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.येथील पवनी तालुक्यातील सोनेगाव स्मशानभूमीजवळ आज मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटल्याची घटना घडली आहे.या वाहनात २७ मजूर होते.वाहन अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.अपघातात १४ मजूर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.यामधील दोन जण गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.जखमींना उपचारासाठी भंडारा येथील रुग्णायात दाखल करण्यात आले आहे.

जखमी मजूर हे अड्याळजवळील नेरला येथील असून सोनेगाव येथे धान कापणीला जात होते.जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान कापणी धडाक्यात सुरू आहे. शेतकरी ट्रॅक्टर व मजुरांच्या सहाय्याने धान कापणी उरकून घेत आहेत.धान कापणीला मजूर मिळत नसल्याने दूरवरून वाहनाने मजूर बोलावून शेतीची कामे उरकून घेत आहेत.अड्याळ जवळील नेरला येथील २७ मजूर हे धान कापणीसाठी वाहनाने नेरला येथून सोनेगाव येथे जात असताना सोनेगाव स्मशानभूमीजवळ वाहनचालक-मालक महेंद्र मुरकुटे रा.नेरला याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन एका शेताच्या बांधावर उलटले.त्यात वाहनातील २७ मजूर जखमी झाले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!