Tuesday, September 22, 2026
Homeभंडारामध्यरात्री गोवंश तस्करी; दोघेजण अटकेत..!

मध्यरात्री गोवंश तस्करी; दोघेजण अटकेत..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-गोवंश तस्करीची कुणालाही भनक लागू नये,यासाठी तस्करांनी मध्यरात्रीचा काळोख निवडला; पण खाकीच्या नजरेतून तस्करांना निसटताच आले नसल्याची घटना उघडकीस आली आहे.लाखांदूर पोलिसांनी लाखांदूर-पवनी राज्य मार्गावरील खैरी-पट फाटा परिसरात काल रविवारच्या मध्यरात्री साडे बारा वाजताच्या सुमारास धडक कारवाई करत
कत्तलखान्यात नेले जाणारी तब्बल ९ गोवंश जनावरांची सुटका केली.प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला व सुमारे ६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पंकज संजय मेश्राम वय २५ वर्षे,रा.चिचोली, ता.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर व मीनल राजवीर सिंग वय २३ वर्षे,रा.गौतमनगर,पवनी,ता.पवनी,जि.भंडारा अशी अटकेतील आरोपी तरुणांची नावे आहेत.
मध्यरात्रीच्या सुमारास दोघेही एमएच ४८ टी २१११ क्रमांकाच्या बोलेरो पीकअप  वाहनात ९ जनावरे कोंबून कत्तलखान्याकडे घेऊन जात होते.दरम्यान,लाखांदूर पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी रात्रकालीन गस्तीवर असतांना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की,एका चारचाकी वाहनातून जनावरांची वाहतूक केली जात आहे.माहिती मिळताच पीएसआय निशांत जुनोनकर, पोलीस अंमलदार परमेश्वर केवट,भूपेंद्र बावनकुळे व पथकातील सहकाऱ्यांनी सापळा रचला.यावेळी संशयित वाहन अडवून तपासणी केली असता त्यात ९ जनावरे आढळून आली.त्यानंतर, दोघांना रंगेहाथ पकडत त्यांच्याकडून वाहन व जनावरांसह एकूण ६ लाख ३५ हजार रुपयांचा माल जप्त केला व जप्त करण्यात आलेली जनावरे संगोपनासाठी लाखनी तालुक्याच्या पिंपळगाव सडक येथील गोरक्षण संस्थेस सुपूर्द करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास लाखांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!