Monday, September 21, 2026
Homeबीडअखेर लाचखोर विभागीय वन अधिकाऱ्यास चार दिवसांची पोलीस कोठडी..

अखेर लाचखोर विभागीय वन अधिकाऱ्यास चार दिवसांची पोलीस कोठडी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ३१ जुलै रोजी जशी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली,तशीच सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड याच्या घरी छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने धाड मारून त्यास रंगेहाथ अटक केली. तक्रारदार हे दुसरे कुणी नसून सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी(RFO)असल्याने एकच खळबळ माजली.लाखो रुपयांचा पगारदार माणूस तब्बल ४५ लाख रुपयांची मागणी करून सापडतो,तर सदरच्या विभागात किती भ्रष्टाचार गुंफलेला असेल,अशी बोंबाबोंब अनेकांच्या मनात घर करून राहिली आहे. महत्वाचे म्हणजे,आरएफओ(RFO)चा बॉस डीएफओ (DFO),त्याचीच बोलती बंद करून टाकल्याने अनेकांनी चुप्पी साधली आहे.धक्कादायक बाब म्हणजे,आरोपी अधिकाऱ्याने तक्रारदाराचा २०२४ मधील सुमारे ४० लाख रुपयांचा निधी रोखून धरला होता.इतकेच नव्हे तर २०२५ मधील निधीसुद्धा मार्च एंडला तीन टप्प्यांत दिला.
निधी अडकवून ठेवून अधिकाऱ्यांना वेठीस धरणे आणि लाच उकळणे ही लखमावाडची दुहेरी शक्कल होती. सध्या एसीबी पथक लखमावाड याच्या इतर संपत्तीची आणि बेकायदेशीर व्यवहारांची सखोल चौकशी करत असून यात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे,लाचखोर लखमावाड हा २०१६ साली एमपीएससीच्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात टॉपर बनला होता. अश्यातच लाचखोरी प्रकरणात एसीबीच्या पथकाने लखमावाड याच्या घरांवर छापे टाकले.नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी येथील मूळ निवासस्थानी तसेच बीड येथील घराची कसून झडती घेतली असता कारवाईत १ लाख ७ हजार रुपयांची कॅश आणि सुमारे ३ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.दरम्यान, लखमावाड यास बीड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!