- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-गोवंश तस्करीची कुणालाही भनक लागू नये,यासाठी तस्करांनी मध्यरात्रीचा काळोख निवडला; पण खाकीच्या नजरेतून तस्करांना निसटताच आले नसल्याची घटना उघडकीस आली आहे.लाखांदूर पोलिसांनी लाखांदूर-पवनी राज्य मार्गावरील खैरी-पट फाटा परिसरात काल रविवारच्या मध्यरात्री साडे बारा वाजताच्या सुमारास धडक कारवाई करत
कत्तलखान्यात नेले जाणारी तब्बल ९ गोवंश जनावरांची सुटका केली.प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला व सुमारे ६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पंकज संजय मेश्राम वय २५ वर्षे,रा.चिचोली, ता.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर व मीनल राजवीर सिंग वय २३ वर्षे,रा.गौतमनगर,पवनी,ता.पवनी,जि.भंडारा अशी अटकेतील आरोपी तरुणांची नावे आहेत.
मध्यरात्रीच्या सुमारास दोघेही एमएच ४८ टी २१११ क्रमांकाच्या बोलेरो पीकअप वाहनात ९ जनावरे कोंबून कत्तलखान्याकडे घेऊन जात होते.दरम्यान,लाखांदूर पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी रात्रकालीन गस्तीवर असतांना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की,एका चारचाकी वाहनातून जनावरांची वाहतूक केली जात आहे.माहिती मिळताच पीएसआय निशांत जुनोनकर, पोलीस अंमलदार परमेश्वर केवट,भूपेंद्र बावनकुळे व पथकातील सहकाऱ्यांनी सापळा रचला.यावेळी संशयित वाहन अडवून तपासणी केली असता त्यात ९ जनावरे आढळून आली.त्यानंतर, दोघांना रंगेहाथ पकडत त्यांच्याकडून वाहन व जनावरांसह एकूण ६ लाख ३५ हजार रुपयांचा माल जप्त केला व जप्त करण्यात आलेली जनावरे संगोपनासाठी लाखनी तालुक्याच्या पिंपळगाव सडक येथील गोरक्षण संस्थेस सुपूर्द करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास लाखांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
- Advertisement -

