- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार पावसाचा नवा अंदाज वर्तवला होता.त्यानुसार,राज्यातील अनेक भागांमध्ये कमी-अधिक पावसाचा जोर दिसून येत आहे.विशेष म्हणजे,पाऊस हा कुणाच्या हातचा नाही; ही नैसर्गिक बाब आहे.त्यामुळे जिकडे बरसला तिकडे धुमाकूळ घालून सोडतो,तर काही ठिकाणी “रिमझिम गिरे सावन सुलग-सुलग जाये मन” अश्या गीताप्रमाणे पावसाची कथा आहे.अश्यातच आज,मंगळवार २१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यंत्रणेकडून विदर्भातील चार जिल्ह्यांसाठी पावसाची पूर्व चेतावणी देण्यात आली आहे.त्यात पुढील २४ तासांत भंडारा,चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या चार जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.अतिवृष्टीमध्ये पाऊस मुसळधार आणि धो-धो बरसू लागतो.यामुळे घरांची पडझड,रस्ते जलमय होऊन खड्डा की रस्ता वा इतर घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
- Advertisement -

