- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील सिंधी समाज बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवासी पट्ट्यांचा मार्ग अखेर मोकळा झाला असून आज,गुरुवार १ जानेवारी रोजी राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शहरातील तब्बल २२ सिंधी बांधवांना निवासी पट्ट्यांचे वाटप करण्यात आले.
सिंधी समाज बांधव १९५२ पासून देसाईगंज शहरामध्ये विस्थापित झाले.अथक परिश्रम करुन हा समाज प्रगतशील झाला.मात्र,यांच्या निवासी पट्ट्यांचा प्रश्न अधांतरी राहिला.सिंधी समाजातील अनेक नेत्यांनी निवासी पट्ट्यांचा प्रश्न शासन दरबारी लावून धरला होता.त्याचबरोबर,माजी आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे किसन नागदेवे,जेसा मोटवानी तसेच मोतीलाल कुकरेजा यांनी सातत्याने निवासी पट्ट्यांबाबत मागणी केली होती.त्यानुसार,गजबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर मागणीस यश आले व महसूल मंत्र्यांनी सिंधी समाजाला पट्टेवाटपाकरीता शासकिय शिबीर आयोजित करावे,असे निर्देश दिले होते.त्यानुसार, आज देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान यांनी शहरातील स्थानिक सिंधूभवन येथे शिबिर आयोजित करुन तब्बल २२ सिंधीबांधवांना निवासी पट्टे प्रदान केले व उर्वरित कुटुंबीयांना सुद्धा लवकरच निवासी पट्ट्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रधान यांनी स्पष्ट केले.
प्रसंगी सिंधी समाजातील ज्या मान्यवरांनी समाजातील लोकांना पट्टे मिळण्यास प्रयत्न केले,असे माजी नगरपरिषद उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा,माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी,नवनिर्वाचित नगरसेवक राहुल सतवानी,नगरसेविका खुशबु साधवानी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास माजी नगरसेवक संतोषकुमार शामदासानी,पत्रकार प्रकाश जिवानी,दिलीप जिवानी,लक्ष्मण रामाणी,किशन शामदासानी,अनिल साधवानी,महेश सचदेव,शंकरलाल खत्री,खेमचंद लालवानी,मोहन डेंगानी,संतुमल डोडानी, राजकुमार मोटवानी,हरिदास मोटवानी,श्रीचंद डेंगानी यांचेसह बहुसंख्य सिंधी समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लक्ष्मण रामानी यांनी केले,तर आभार नगरसेवक राहुल सतवानी यांनी मानले.
- Advertisement -

