Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीआज नक्षलपीडित कुटुंबातील २९ उमेदवारांना नोकरीचे नियुक्तीपत्र.

आज नक्षलपीडित कुटुंबातील २९ उमेदवारांना नोकरीचे नियुक्तीपत्र.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नक्षलवादामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी व त्यांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने नववर्षाच्या सुरुवातीलाच एक महत्त्वपूर्ण निर्णय अंमलात आणला आहे.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या पुढाकारातून नक्षलपीडित कुटुंबातील २९ तरुणांना शासनसेवेत सामावून घेत जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत शिपाई पदावर नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.या निर्णयामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात स्थैर्य आणि आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हिंसाचारात गोपनीय माहितीदारांची हत्या झालेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासन निर्णयान्वये अशा कुटुंबातील एका सदस्याला शासनसेवेत सामावून घेण्याची तरतूद आहे. मात्र,प्रत्यक्ष अंमलबजावणी दरम्यान रिक्त पदांचा अभाव ही मोठी अडचण ठरत होती.ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी वरिष्ठ स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करत जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत पूर्वी निरसीत करण्यात आलेली २९ शिपाई संवर्गाची पदे पुनर्जीवित करून घेतली.
या प्रशासकीय प्रयत्नांचे फलित म्हणून आज,गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी नक्षलपीडित कुटुंबातील २९ उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत शिपाई पदावर रुजू होण्यासाठी नियुक्ती आदेश देण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते या नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की,शासनसेवेत प्रवेश मिळालेली ही संधी केवळ रोजगारापुरती मर्यादित नसून समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून काम करण्याची संधी आहे.सेवेत कार्यरत असतांना नियमांचे काटेकोर पालन,जनतेप्रती संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे,असे त्यांनी आवर्जून नमूद केले.तसेच,सेवेत रुजू होतांना आवश्यक असलेले प्रशिक्षण प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल,असे आश्वासन देत त्यांनी नवनियुक्त सर्व २९ कर्मचाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे,निवासी उपजिल्हाधिकारी अस्मिता मोरे, आस्थापना शाखेचे तहसीलदार सचिन जयस्वाल तसेच नवनियुक्त कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!