Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरमहानगरपालिका निवडणूक; आम आदमी पक्षाचे उमेदवार जाहीर..

महानगरपालिका निवडणूक; आम आदमी पक्षाचे उमेदवार जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-राज्यातील २९ महानगरपालिकांचे पडघम वाजले असून मंगळवार २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.३० डिसेंबरपर्यंत उमेदवारांना आपली उमेदवारी दाखल करता येणार आहे.त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी केली जाईल.तर २ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे.त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ जानेवारी २०२६ रोजी अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली जाईल,तसेच उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करता येईल.त्यानंतर १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान,तर त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १६ जानेवारी रोजी मत मोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे.तत्पूर्वी चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत विविध पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू करून निवडून येण्यायोग्य उमेदवारांचा शोध सुरू केल्याचे चित्र आहे.अश्यातच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी चंद्रपूर आम आदमी पक्षाच्या वतीने विविध प्रभागातून दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.विशेष म्हणजे,पक्षाने शिक्षित,तरुण,सामाजिक कार्याचा अनुभव असलेल्या तसेच विविध क्षेत्रांतील व्यावसायिक उमेदवारांना संधी दिली आहे.यात अभियंते,पत्रकार तसेच उच्चशिक्षित समाजसेवकांचा समावेश आहे.
जाहीर उमेदवार👇
प्रभाकर आवारी (प्रभाग क्र.-१ ब)
योगेश गोखरे (प्रभाग -१ ड),
संतोष बोपचे (प्रभाग- ३ क),
सुनिल सदभय्या (प्रभाग -७ ड)
मयूर राईकवार (प्रभाग -८ ब),
इंजि.विनोद नगराळे (प्रभाग -१० अ)
तबसूम शेख (प्रभाग -११ क)
राजू कुडे(प्रभाग क्र.-१३ ड)
सुनिल रत्नाकर भोयर (प्रभाग-१५ ब)
 जयदेव देवगडे (प्रभाग- १७ अ)
सदरची यादी ही आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश जॉइंट सेक्रेटरी सुनिल देवराव मुसळे यांनी जाहीर केली असून केवळ सत्तेसाठी नाही,तर समाजकार्यासाठी पुढे सरसावणाऱ्या पक्षास जनतेकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!