Sunday, July 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतातील मोटार पंप काढायला गेले अन् जीव गमावून बसले; चार जणांचा दुर्दैवी...

शेतातील मोटार पंप काढायला गेले अन् जीव गमावून बसले; चार जणांचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतातील विहिरीत अडकलेली नादुरुस्त मोटार पंप क्रेनच्या साहाय्याने काढत असतांना क्रेनचा जवळच असलेल्या हायव्होल्टेज विद्युत तारेला स्पर्श होऊन तब्बल चार जणांना विजेचा तीव्र धक्का बसल्याने बाप-लेकासह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार २७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडली.यात कासिम कोंडिबा फुलारी वय ५४ वर्षे,१६ वर्षीय मुलगा रतन कासिम फुलारी,शेत मजूर रामलिंग नागनाथ साखरे वय ३० वर्षे व नागनाथ साखरे वय ५५ वर्षे अशी मृतकांची नावे असून घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज शनिवारी केशेगाव येथील गणपती शिवाप्पा साखरे यांच्या शेतातील विहिरीवर दुरुस्तीचे काम सुरू होते. विहिरीतील नादुरुस्त असलेली मोटार पंप बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली होती.
कामादरम्यान मोटार वर खेचतांना क्रेनचा लोखंडी भाग वरून जाणाऱ्या महावितरणच्या हायव्होल्टेज
(उच्च दाब)विद्युत वाहिन्यांना लागला.क्षणातच प्रचंड विद्युत प्रवाह क्रेनमधून खाली उतरला.त्यात,मोटार काढण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चौघांचाही जागेवरच मृत्यू झाला.एकाच वेळी गावातील चार जणांचा असा मृत्यू झाल्याने केशेगावमध्ये शोककळा पसरली आहे.घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली.माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.घडलेल्या दुर्घटनेमुळे शेतीकामातील सुरक्षिततेचा प्रश्न आणि शेतांमधून जाणाऱ्या महावितरणच्या उच्च दाबाच्या तारांचा धोका पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

व्हॉट्सॲपवरील ‘एपीके’ फाइलने केला घात; दहा लाखाला गंडा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका निवृत्त कर्मचाऱ्याला मोबाईल व्हॉट्सॲपवर पाठवलेली बनावट 'एपीके' फाइल उघडणे चांगलेच महागात पडले आहे.फाईल उघडताच सायबर चोरट्यांनी मोबाईल हॅक करून त्यांच्या...

चीमुकलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या वृद्धाला अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती पोलिस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक व किळसवाणा प्रकार समोर आला आहे.परिसरातील इतर मुलांसोबत खेळत असलेल्या एका ४ वर्षीय चीमुकलिशी...

पोलिसांनी पकडले सुगंधीत तंबाखूचे मोठे १० पोते..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-सध्याच्या घडीला राज्याच्या विविध भागात अवैध सुगंधित तंबाखू,गुटखा व इतर मादक पदार्थ विक्री तथा त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू असतांनाच...

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या समान निधी(Matching Schemes)व असमान निधी(Non-Matching Schemes)योजनांद्वारे राज्यातील शासनमान्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!