Wednesday, July 29, 2026
Homeचंद्रपूरमित्राला सोडून देण्यासाठी देसाईगंजला गेलेल्या ब्रम्हपुरीच्या तरुणाची वैनगंगा नदीत उडी...

मित्राला सोडून देण्यासाठी देसाईगंजला गेलेल्या ब्रम्हपुरीच्या तरुणाची वैनगंगा नदीत उडी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी शहरात वास्तव्यास असणारा २२ वर्षीय तरुण मित्राला सोडून देण्यासाठी दुचाकीने देसाईगंजला(वडसा)गेला.मात्र,परतीच्या वाटेवर असणाऱ्या देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली असल्याची घटना रविवारी २० एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून काल,सोमवार २१ एप्रिलला तरुणाचे मृतदेह बाहेर काढण्यात ब्रम्हपुरी पोलिसांना यश आले आहे.कौशीक रंगराव खोब्रागडे,रा.ता. ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याचे वडील रंगराव खोब्रागडे हे ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,कौशीकने यापूर्वीही दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.घटनेच्या दिवशी रविवारी तो सायंकाळच्या सुमारास ब्रम्हपुरीहून सायंकाळी पाचच्या दरम्यान,मित्राला सोडून देण्यासाठी देसाईगंजला गेला होता.मात्र,बराच उशीर होऊनही कौशिक घरी न आल्याने कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली व सोबत गेलेल्या मित्राला संपर्क साधून विचारणा केली असता,तो केव्हाचाच गेला असल्याची माहिती दिली.त्यानुसार कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही त्याचा थांगपत्ता लागलेला नव्हता.अशातच काही नागरिकांनी हरदोली नदिघाटावरून कुणीतरी नदीत उडी घेतल्याची माहिती दिली.त्यानुसार याबाबत ब्रम्हपुरी पोलीस प्रशासनास माहिती देण्यात आली.काल सोमवारी पोलिसांनी नदी परिसरात शोधाशोध केली असता,मृतदेह सापडला.मृतदेह पाहून आईने एकच टाहो फोडला. कौशिकने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कां उचलले? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस प्रशासन करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!