Saturday, September 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता चंद्रपूर जिल्हा परिषदेचे नवे सिईओ पुलकित सिंग तर विवेक जॉन्सन बीडचे...

आता चंद्रपूर जिल्हा परिषदेचे नवे सिईओ पुलकित सिंग तर विवेक जॉन्सन बीडचे जिल्हाधिकारी.. – राज्यातील पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील बदल्यांचे सत्र संपता-संपेना..! राज्य सरकारकडून आतापर्यंत अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या(IAS) बदल्या करण्यात आल्या आहेत.अशातच आज,मंगळवार २२ एप्रिलला राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.आता चंद्रपूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी(सिईओ)म्हणून पुलकित सिंग यांना नियुक्त करण्यात आले आहे.तर यापूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना बीड जिल्हाधिकारी पदावर नियुक्त करण्यात आले आहे.बीड जिल्हा हा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने हादरवून सोडणारा जिल्हा आहे.
१. पुलकित सिंग हे २०२१ बॅचचे आयएएस अधिकारी असून यापूर्वी ते सहाय्यक जिल्हाधिकारी,अंबड उपविभाग,जालना या ठिकाणी कार्यरत होते.आता त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे नियुक्त करण्यात आले आहे.
२. विवेक जॉन्सन हे  २०१८ बॅचचे आयएएस अधिकारी असून यापूर्वी ते मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद चंद्रपूर या ठिकाणी कार्यरत होते.तर आता त्यांना बीड येथे नियुक्त करण्यात आले आहे.
३. अविनाश पाठक हे २०१३ बॅचचे आयएएस अधिकारी असून यापूर्वी ते जिल्हाधिकारी बीड या ठिकाणी कार्यरत होते.तर आता त्यांना व्यवस्थापकीय संचालकपदी,मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ,मुंबई या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे.
४. शुभम गुप्ता हे २०१९ बॅचचे आयएएस अधिकारी असून यापूर्वी ते सदस्य सचिव,विदर्भ वैधानिक विकास मंडळ,नागपूर या ठिकाणी कार्यरत होते.तर आता त्यांना व्यवस्थापकीय संचालक,पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ,पुणे या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे.
५. अभिषेक कृष्णा हे २००६ बॅचचे आयएएस अधिकारी असून यापूर्वी ते सदस्य सचिव,महा.जीवन प्राधिकरण मुंबई या ठिकाणी कार्यरत होते.तर आता त्यांची संचालक,महानगरपालिका प्रशासन,मुंबई या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!