- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-निवडणुका आल्या की,राजकारणी लोकं मोठ-मोठ्या थापा मारून सत्तेवर विराजमान होतात. एकदा का सत्तेत शिरले की,जनतेला दिलेली आश्वासने विसरून जातात.त्यामुळे गोर-गरीब,सर्वसामान्य जनता ज्या आशेवर असतात,अश्या आशेवर पाणी फेरले जात असल्याने अनेकजण टोकाचे पाऊल उचलतांना दिसून येतात.असाच प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे.ऐन सणाच्या दिवशीच शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला व सततच्या नापिकीला कंटाळून स्वतःच्याच शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथे काल,रविवारी ३० मार्चला गुढी पाडव्याच्या दिवशी घडली.नागेश घनश्याम वाघाये वय६५ वर्षे रा.केसलवाडा (वाघ), ता.लाखनी,जि.भंडारा असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शासनाकडून कर्जमाफी होईल या भोळ्या आशेवर त्याने कर्ज घेतले होते.अशातच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दोन ते तीन वर्षे शेतीची कर्जमाफी होणार नसल्याचे जाहीर केले होते.शासनाने कर्जमाफीची कोणतीही घोषणा न केल्यामुळे त्यांनी २ दिवसांपूर्वी हातउसने करून सोसायटीचे कर्ज भरले होते.त्यातच हातउसने केलेली रक्कम कुठून परत करावी,या विवंचनेत शेतकरी पडला होता.अशातच शेतात गत काही दिवसांपासून वीज नसल्यामुळे उन्हाळी हंगामात लावलेले धान करपण्याच्या मार्गावर असतांनाच धान पिकाला विविध रोगाने ग्रासले असल्याने उसनवारीने घेतलेले पैसे परत कसे करायचे, या विवंचनेत राहून त्यांनी स्वतःच्या शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.सदर घटनेची नोंद लाखनी पोलिसांनी करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला.त्यांच्या पार्थिवावर केसलवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन भाऊ,पत्नी,एक मुलगा व मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.नागेश यांच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

