Monday, August 3, 2026
Homeबीडऐन सणाच्या तोंडावर मशिदीत स्फोट; दोघांना अटक..

ऐन सणाच्या तोंडावर मशिदीत स्फोट; दोघांना अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-जिल्ह्याला काही कालावधीपासून ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.विविध गुन्हेगारी प्रकरणात बीड जिल्हा आघाडीवर येत आहे.सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असतानांच बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.उद्या सोमवार ३१ मार्चला रमजान ईद पूर्वीच बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास गावातील मशिदीमध्ये दोन युवकांनी जिलेटीनच्या माध्यमातून स्फोट घडवून आणल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आज रविवारी पहाटेच गाव गाठून तपास सुरू केला होता.स्फोटात मशिदीतील फरशी फुटली तसेच भिंतीला भेगा पडल्या.पण सुदैवाने कोणीतीही जीवितहानी झालेली नाही.प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात मशिदीत स्फोट घडवून आणण्यापूर्वी आरोपी विजय गव्हाणे याने चक्क इंस्टाग्रामवर रील बनवले असल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी या प्रकरणात विजय गव्हाणेसह श्रीराम सागडे याला देखील ताब्यात घेतलं आहे. ‘शिस्तीत रहा बेट्या मी अंगार भंगार नाय रे’, असे गाणे लावत आरोपीने रील बनवला.व्हिडीओत आरोपीच्या हातात जिलेटीनच्या कांड्या आणि तोंडात सिगारेट आहे.पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनेप्रकरणी दोन आरोपींना तात्काळ अटक केली आहे.गावातील स्थानिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
(जिलेटीनच्या कांड्यांचा वापर स्फोटक म्हणून खाणकामच्या ठिकाणी केला जातो.विशेषता: विहिर खोदने,रस्ते किंवा इतर कामांदरम्यान अडथळा ठरणारे मोठमोठे दगड किंवा खडक फोडण्यासाठी जिलेटीनचा वापर केला जातो.)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता “पोलीस पाटी” अथवा “पोलीस” नाव लिहिलेल्या खासगी वाहनांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या खासगी दुचाकी वा चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे लाल अक्षरात लिहिणे किंवा तशी पाटी लावून...

तलावात बुडालेल्या तरुणाचा आज सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या धानोरी गावातील २२ वर्षीय तरुण काल रविवारच्या सायंकाळी गाव तलाव परिसरात आंघोळ करण्यासाठी उतरला असता क्षणात दिसेनासा झाल्याने परिसरात एकच...

गडचिरोली जिल्हा माहिती अधिकारी जाधव यांची बदली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांची प्रशासकीय कारणास्तव नांदेड येथे बदली करण्यात आली असून आज,सोमवार ३ ऑगस्ट रोजी त्यांना गडचिरोली...

सावधान..! तुमच्याही बँक खात्याचा होऊ शकतो सायबर फसवणुकीसाठी गैरवापर.. – नागरिकांनी आपले बैंक खाते,एटीएम कार्ड,पासबुक कुणालाही वापरण्यासाठी देऊ नये.. – आपले बँक खाते...

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात मागील काही दिवसांत सायबर गुन्हेगारीचा नवीनच गंभीर प्रकार समोर आला आहे.यामध्ये अनेक बँक खातेधारक अडकल्याचे स्पष्ट झाले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!