Friday, June 19, 2026
Homeनागपूरमहाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती सोपवा व दीक्षाभूमीसाठी अतिरिक्त जागा देण्यात यावी......

महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती सोपवा व दीक्षाभूमीसाठी अतिरिक्त जागा देण्यात यावी… – पंतप्रधान मोदिंशी चर्चा करीत मागणीचे निवेदन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती सोपवा,दीक्षाभूमीसाठी अतिरिक्त जागा देण्यात यावी,अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती (दीक्षाभूमी) चे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.पंतप्रधान मोदी यांनी काल रविवारी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली.यावेळी त्यांनी गौतम बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.याप्रसंगी भदंत ससाई यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली.तसेच मागणीचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले की, बोधगया हे जगातील सर्व बौद्धांचे पवित्र स्थान आहे.या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली होती.या महाविहाराची निर्मिती सम्राट अशोक यांनी केली होती.तेथील १९४९ बीटी ॲक्ट रद्द करून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावे.तसेच दीक्षाभूमीत येणाऱ्या अनुयायांसाठी जागा अपुरी पडत आहे.भविष्याचा विचार करता माता कचेरी,कॉटन रिसर्च सेंटर येथील २१ एकर जागा दीक्षाभूमीला देण्यात यावी.याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक,स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. राजेंद्र गवई, आनंद फुलझेले, एन. आर. सुटे, दादाराव दाभाडे उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!