- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर शहरात एका मृत अर्भकाचे शव आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही काल शनिवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.चिमूर शहराच्या पिंपळनेरी रोड पोलीस स्टेशन समोरील झुडपात मोकाट कुत्रे एका मृत अर्भकाला खातांना दुचाकीवरून जाणाऱ्या चिमूर पोलीस ठाण्यातील महिला पोलिस अधिकारी मयुरी कोराम यांना दिसून आले.त्यानुसार त्यांनी याबाबत नागरिकांना सोबत घेऊन मोकाट कुत्र्यांना पळवून लावले.सदर घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.याबाबत चिमूर पोलीस प्रशासनास माहिती होताच घटनास्थळ गाठून चंद्रपूर येथून श्वान पथकास पाचारण करण्यात आले. पोलिसांनी शोध मोहीम राबविली असता तपास अंती मृत अर्भकास शहरातील जुना वडाळा रस्त्यावरील नळ योजनेच्या एका खड्ड्यात गाळण्याची योजना होती.पोलिसांनी लगेच त्या अर्भकाला ताब्यात घेतले. अर्भकाचा पाय व छाती खालील भाग मोकाट कुत्र्यांनी खाल्ला असून तोंड व पाय कायम असल्याचे दिसून आले.सदर अर्भक ८ ते ९ महिन्याचे असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे करीत आहेत.सदर अर्भक कुणी टाकला व त्या अर्भकाचे निर्दयी माता-पिता कोण? याचा शोध लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.
- Advertisement -

