भंडारा :-भंडारा (बेला) येथील रहिवासी असलेल्या कृषीपर्यवेक्षकाचा १८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आनंद बालाजी मोहतूरे वय ४८ वर्षे असे असे मृताचे नाव आहे.भंडारा येथील कृषी विभागात आनंद मोहतुरे हे कृषी पर्यवेक्षक या पदावर कार्यरत होते. घटनेच्या पूर्वी त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे आपल्या सहकाऱ्यांसोबत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली.७.३० ते ७.४५ च्या दरम्यान प्रकृती बरी वाटत नसल्याने त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले.त्यातच उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भ्रमणध्वनीद्वारे चर्चा अन् क्षणातच हृदयविकाराचा झटका… – हृदय विकाराच्या झटक्याने कृषीपर्यवेक्षकाचा मृत्यू…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

