Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरपोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला ताब्यात घेत केली अटक... - इन्स्टाग्रामवरून सूत...

पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला ताब्यात घेत केली अटक… – इन्स्टाग्रामवरून सूत जुळले अन् भेटण्याच्या बहाण्याने बलात्कार करून तरुणीला ठार केल्याचे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-उमरेड-गिरड महामार्गालगत एमआयडीसी बसथांबा परिसरात लैंगिक अत्याचार करून प्रेयसीची हत्या करण्यात आलेल्या प्रकरणातील आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.लोकेश गोपाळ जुगनाके ३०,रा.अड्याळ टेकडी,ता.नागभीड, जि.चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
सोमवारी १८ नोव्हेंबरच्या सकाळी १० वाजताच्या सुमारास पूजा नरेश मुंघाटे वय २६, रा.कावरापेठ, उमरेड या तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला ताब्यात घेत अटक केली.लोकेश जुगनाके हा पेंच अभयारण्य परिसरात कुक आहे.
काही महिन्यांपूर्वी मृत पूजा आणि आरोपी लोकेश याची इन्टाग्रामवर ओळख झाली.ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेम प्रकरण सुरू झाले.रविवारी  १७ नोव्हेंबर रोजी पूजा अगदी सकाळीच टिफीन आणि बॅगसह शिबिरासाठी जात असल्याचे सांगून गेली होती.दिवसभरात तिचा काहींशी वार्तालापही झाला होता.शिवाय,रात्री आईसोबतसुद्धा तिने संवाद साधला होता.
रात्रभर दोघेही ब्रम्हपुरी परिसरात थांबले.सकाळीच ब्रम्हपुरी येथून ट्रॅव्हल्सने उमरेडला निघाले. हत्याकांडाचा हा प्रकार सोमवारी सकाळच्या सुमारास घडला असावा,असा कयास लावला जात आहे. आरोपीने दुपट्टयाने गळा आवळून तिची हत्या केली, असे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याची बाब समोर येत आहे.दरम्यान, काल मंगळवारी आरोपी लोकेश जुगनाके याला उमरेड न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने त्याला २२ नोव्हेंबरपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३,६४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पूजा मुंघाटे हिचा मृतदेह आढळून आल्यानंतर उमरेड ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले.उमरेड येथे दुपारी शवविच्छेदनाची प्रक्रिया आटोपली.येथून सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास दुसऱ्यांदा शवविच्छेदनासाठी नागपूर मेडिकलला मृतदेह रवाना केला गेला. आज,मंगळवारी अगदी सकाळपासूनच आप्तस्वकीय शवविच्छेदनाची प्रतीक्षा करीत होते. कागदपत्रांची जुळवाजुळव आणि प्रक्रियेला विलंब लागला,या लेटलतीफ कारभारामुळे काल,मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास नातेवाइकांना मृतदेह सुपुर्द करण्यात आला.नागपूर मेडिकलला तब्बल २४ तासांनंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडत असेल,तर ही बाब गंभीर असल्याचा संताप नातेवाइकांनी व्यक्त केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!