- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या,बुधवार दिनांक-२० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात वाजतापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या तीन मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होईपर्यंत त्या मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे.यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.मतदारांनी आपला मतदानाचे कर्तव्य निभावून लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी पूर्ण करावी. लोकशाहीचा हा उत्सव साजरा करतांना प्रशासनामार्फत किमान ८० टक्के मतदानाचे उद्दष्टि ठेवण्यात आले असले तरी सर्वांधिक मतदानाचा नवा आदर्श निर्माण करण्यासाठी मतदारांनी उत्स्फुर्तपणे जास्तीत जास्त संख्यने मतदानात सहभाग नोंदवावा; असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
जिल्ह्यात ८ लाख २१ हजार ४५५ मतदार बजावणार मतदानाचा हक्क👇
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४ लाख १२ हजार १५१ पुरूष,४ लाख ९ हजार २९४ महिला आणि १० तृतीयपंथी असे एकूण ८ लाख २१ हजार ४५५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात
१)आरमोरी मतदारसंघात १ लाख ३१ हजार ६० पुरूष,तर १ लाख ३१ हजार ७१० महिला व १ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ६२ हजार ७७१ मतदार,
२)गडचिरोली मतदारसंघात १ लाख ५४ हजार ६१० पुरूष,तर १ लाख ५२ हजार ६१० महिला व ३ तृतीयपंथी असे एकूण ३ लाख ७ हजार २२३ मतदार आणि
३)अहेरी मतदारसंघात १ लाख २६ हजार ४८१ पुरूष,तर १ लाख २४ हजार ९७४ महिला व ६ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ५१ हजार ४६१ मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यात पुरूष व महिला मतदारांची संख्या जवळपास समसमान आहे.जिल्ह्यात १७ हजार ६६५ नवमतदार,जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटात ९ हजार ९१५ पुरूष, ७ हजार ७४९ स्त्री व १ तृतीयपंथी असे एकूण १७ हजार ६६५ नवमतदार आहेत.
- Advertisement -

