Thursday, July 9, 2026
Homeभंडारालग्नाची वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या ओमनी व्हॅनचा भीषण अपघात; ५ जण जागीच ठार,तर...

लग्नाची वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या ओमनी व्हॅनचा भीषण अपघात; ५ जण जागीच ठार,तर चारजण जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-एखादा लग्न म्हटला तर अनेकजण आनंदाने सहभागी होतात.पण,याच आनंदावर विरजण पडल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात घडली. रात्रीच्या सुमारास लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या एका ओमनी व्हॅनचा भीषण अपघात झाला असून,घडलेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला,तर चारजण जखमी झाल्याची घटना काल गुरुवारच्या रात्री पावणे दहाच्या सुमारास पवनी तालुक्याच्या अड्याळ गावालगतच्या सहाय्यतानगर परिसराजवळ घडली.नयना देवराम नगरे वय १८ वर्षे व दुर्गा देवराम नगरे वय ४२ वर्षे,रा.अड्याळ,ता.पवनी या दोघी मायलेकी,मुन्नी प्रभाकर चाचरकर वय ४३ वर्षे व प्रभाकर चाचरकर वय ४८ वर्षे, रां.वेलतूर,जि.नागपूर दोघेही पती-पत्नी व श्वेता पुरुषोत्तम नगरे वय १६ वर्षे,रा.अड्याळ,ता.पवनी, जि.भंडारा अशी अपघातात मृत पावलेल्या पाच जणांची नावे आहेत.तर रक्षा खेडकर वय २० वर्षे व स्नेहा गिरीधर नान्हे वय १८ वर्षे दोघीही अड्याळ येथील रहिवासी असून या अपघातात गंभीर झाल्याने त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.तर उमेश बोधनलाल सोनवणे वय २४ वर्षे,रा.खैरलांजी,मध्य प्रदेश व ओमनी व्हॅनचा चालक सोहम जागेश्वर गेडाम वय २५ वर्षे,रा.पिंपळगाव दोघेही किरकोळ जखमी झाल्याने त्यांना अड्याळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की,पवनी तालुक्याच्या
अड्याळ गावातील सुदर्शन नान्हे यांचा विवाह काल गुरुवारी अड्याळ गावापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढा(कोसरा)येथील एका चर्चमध्ये होता. सायंकाळच्या सुमारास विवाह आटोपल्यानंतर वऱ्हाडी जेवण करून रात्री एमएच ३६ झेड ०८६१ क्रमांकाच्या ओमनी व्हॅनने अड्याळला जाण्यासाठी निघाले.विशेष म्हणजे,ओमनी व्हॅनने पहिल्या फेरीत काही वऱ्हाड्यांना गावात पोहचवले होते व दुसऱ्या टप्प्यात ९ वऱ्हाडी घेऊन जात असतांनाच व्हॅन अड्याळ गावाजवळ आली असता,अचानक गाडीचा टायर फुटला.टायर फुटल्याने चालकाचे व्हॅनवरील नियंत्रण सुटले आणि ही भरधाव व्हॅन समोरून येणाऱ्या एका सीजी ०८ एडब्ल्यू ६६३५ क्रमांकाच्या मोठ्या दहा चाकी ट्रकला जाऊन जोरात आदळली.हा अपघात इतका भीषण होता की व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला.अपघाताच्या भीषणतेमुळे पाच जणांनी जागीच प्राण गमावले.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि अड्याळ पोलिसांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले.पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्या घेतले असून अड्याळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.लग्नाचा सोहळा आटोपून सुखरूप घरी परतणाऱ्या वऱ्हाड्यांना अशा प्रकारे काळाने गाठावे,या विचारानेच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

आता गावातील स्मशानभूमीचा दाखल द्या अन् विविध योजनेचा निधी मिळवा.. – ग्रामीण भागात तब्बल ७ हजार ४४४ गावांमध्ये स्मशानभूमीच नाही..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागात आजही तब्बल ७ हजार ४४४ म्हणजेच जवळपास २० टक्के गावांमध्ये स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना मरणयातना सहन कराव्या...

लॉजमध्येच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-नुकतेच चार दिवसांपूर्वी वर्धा शहराच्या कारला रोडलगत असलेल्या वैष्णवी कॉम्पलेक्स जवळील नखाते लेआऊट परिसरात स्वतःच्याच घरी देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी रंगेहाथ अटक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!