Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीइतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांनी विविध कर्ज व व्याज परतावा योजनांचा लाभ...

इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांनी विविध कर्ज व व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-इतर मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे जिल्हास्तरीय कामकाज आता गडचिरोली येथे सुरू करण्यात आले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध आर्थिक विकास योजनांचा लाभ स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे.
राज्य शासनाने इतर मागासवर्गीय समाजातील विविध घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळासह विविध समाजघटकांसाठी १३ उपमहामंडळांची स्थापना केली आहे.यामध्ये लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ,सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ(लाडशाखीय वाणी/वाणी समाज),स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे(लोणारी)आर्थिक विकास महामंडळ,श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ,संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ,सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ,संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ(सोनार समाज),संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ(तेली समाज),संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ(बारी समाज),आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ(लिंगायत समाज), संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ(गुरव समाज)तसेच संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ(नाभिक समाज)यांचा समावेश आहे.
महामंडळामार्फत पात्र लाभार्थ्यांसाठी विविध स्वयंरोजगार व आर्थिक विकासाभिमुख अशा सहा महत्त्वाच्या योजना राबविण्यात येत आहेत.यामध्ये रु. १ लाखांपर्यंतची थेट कर्ज योजना,वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना,२० टक्के बीज भांडवल योजना,गट कर्ज व्याज परतावा योजना,शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना आणि महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना यांचा समावेश आहे.या सर्व योजना पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे.
पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करावेत.अर्ज प्रक्रियेसंदर्भात किंवा योजनांबाबत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,आयटीआय मागे,कॉम्प्लेक्स,गडचिरोली येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०७१३२-२२३०२४ वर संपर्क साधावा.
जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय समाजातील पात्र युवक,महिला,स्वयंरोजगार इच्छुक तसेच उद्योजकांनी शासनाच्या विविध आर्थिक विकास योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे,असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक के.के.सातपुते यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!