Wednesday, July 8, 2026
Homeगडचिरोलीगिझर दुरुस्तीचे काम करतांना विजेचा जोरदार शॉक; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..

गिझर दुरुस्तीचे काम करतांना विजेचा जोरदार शॉक; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पाणी गरम करण्याचे गिझर दुरुस्तीचे काम करतांना अचानकपणे विजेचा जोरदार शॉक लागून एका २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, बुधवार ८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास गडचिरोली शहरात घडली.अरविंद भोपये वय २९ वर्षे,हल्ली रा.शाहूनगर,गडचिरोली(मूळ रा.मुरमाळी)असे मृतक तरुणाचे नाव असून तो विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीचे काम करायचा.
अरविंद भोपये हा आज बुधवारी गडचिरोली शहराच्या आशीर्वाद नगर परिसरातील प्रदीप इंदूरकर यांच्या घरातील पाण्याचा गिझर बंद पडल्याने दुरुस्तीसाठी गेला होता.गिझर दुरुस्तीचे काम करीत असतांनाच अचानकपणे त्याला विजेचा जोरदार शॉक बसला.यात तो जागीच कोसळला.लागलीच अरविंदला तात्काळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र,रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षलवादी तारक्का व मदनी तोरेम यांना शिधापत्रिकाचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी...

देसाईगंज उपविभागातील रेती घाटांना नियमानुसार परवानगी; ३०० कोटींच्या महसूल बुडविल्याचा आरोप निराधार.. – देसाईगंज उपविभागीय अधिकाऱ्यांचा खुलासा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज उपविभागातील रेती घाटांना शासनाच्या वाळू निर्गती धोरणानुसार व विहित प्रक्रियेचे पालन करूनच परवानगी देण्यात आली असून माध्यमातून प्रसिद्ध ३०० कोटीचा...

अखेर अपघातातील गंभीर जखमी पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कुरूड-कोंढाळा बिटातील संतोष रमेश मरसकोल्हे वय ५६ वर्षे, रा.आरमोरी,जि.गडचिरोली यांचा शनिवार ४ जुलै २०२६ रोजीच्या पहाटे देसाईगंजवरून दुचाकीने आरमोरीकडे परत...

उद्याला शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन; शिक्षकांच्या प्रश्नांकडे वेधणार लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त :-शिक्षकांचे राज्य स्तरावर प्रलंबीत प्रश्न निकाली काढण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना,शिक्षक संघटना समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!