Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीआत्मसमर्पित नक्षलवादी तारक्का व मदनी तोरेम यांना शिधापत्रिकाचे वितरण..

आत्मसमर्पित नक्षलवादी तारक्का व मदनी तोरेम यांना शिधापत्रिकाचे वितरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी बळ देत महसूल प्रशासनाने तत्परतेने आत्मसमर्पित नक्षलवादी तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडाम आणि मदनी गणपत तोरेम यांना शिधापत्रिका मंजूर करून त्यांचे वितरण केले.अहेरी तहसील कार्यालयात तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या हस्ते आज,बुधवार ८ जुलै रोजी शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडाम ही एकेकाळी नक्षल चळवळीतील दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य म्हणून कार्यरत होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तारक्का यांनी १ जानेवारी २०२५ रोजी,तर त्यांचे पती सोनू उर्फ भूपती यांनी १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी आत्मसमर्पण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केला होता.शासनाच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना आवश्यक शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.शिधापत्रिका मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!