Wednesday, July 22, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज पोलिसांनी अवैध दारूच्या ५२० गुन्ह्यांतील ६१ लाखाच्यावर मुद्देमाल केला नष्ट..

देसाईगंज पोलिसांनी अवैध दारूच्या ५२० गुन्ह्यांतील ६१ लाखाच्यावर मुद्देमाल केला नष्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-पोलीस स्टेशन देसाईगंज येथील सन २०१८ ते २०२४ या कालावधीतील  दाखल एकुण ५२० गुन्ह्यांतील महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये जप्त करण्यात आलेला ६१ लाख ७७ हजार ३३० रुपयांचा अवैध दारूचा मुद्देमाल आज, शुक्रवार २८ मार्च रोजी देसाईगंज पोलिसांकडून नष्ट करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक मोठ्या प्रमाणावर केली जाते.त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यात अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर धडक मोहीम राबवून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात लाखो रुपयांचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानुसार न्यायालय व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क  गडचिरोली यांचे परवानगीने आज,शुक्रवारी पोलीस स्टेशन देसाईगंजचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी राज्य उत्पादक शुल्क गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक चंदन भगत व शु.के.चौधरी यांच्यासह पोलीस स्टेशन देसाईगंज हद्दीतील विविध दारुबंदी गुन्ह्यांतील जप्त मुद्येमाल नष्ट केला.यात विदेशी दारुच्या १८० मिलीच्या २६६६ बॉटल,विदेशी दारुच्या २ लिटर क्षमतेची १ बॉटल,विदेशी दारुच्या १,००० मिलीच्या ६ बॉटल,विदेशी दारुच्या ९० मीली मापाच्या ६२ बॉटल,विदेशी दारुच्या ३७५ मीली मापाच्या ७ बॉटल,देशी दारुच्या १८० मिलीच्या २८ बॉटल,देशी दारुच्या ९० मिलीच्या १,०१०१५ बॉटल,६५० मिली बिअरच्या २९ बॉटल,५०० मिली मापाचे बियरचे २४५ टिनाचे कॅन,३३० मिली मापाचे बियरचे ४८ बॉटल असे एकुण ६१ लाख ७७ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष रोड रोलरच्या सहाय्याने बॉटलांचा चुरा करण्यात आला.
सदरची कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक  नीलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश तसेच कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन देसाईगंजचे पोलीस निरीक्षक अजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार दांडेकर,श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दुर्योधन सरपे,पोलीस अंमलदार शैलेश तोरकपवार, पुंडलीक मानकर,सतीश बैलमारे यांनी पार पाडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!