Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरट्रॅव्हल्स आणि हायवा ट्रकची समोरासमोर धडक; वाहनचालकांसह १५ प्रवासी जखमी...

ट्रॅव्हल्स आणि हायवा ट्रकची समोरासमोर धडक; वाहनचालकांसह १५ प्रवासी जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-ट्रॅव्हल्स आणि हायवा ट्रकची समोरासमोर धडक होऊन वाहनचालकांसह १५ प्रवासी जखमी झाले झाल्याची घटना काल,गुरुवारी २७ मार्चच्या दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ब्र म्हपुरी-नागभीड मार्गावरील सायगटा मंदिराजवळ घडली.
श्री ताज कंपनीची ट्रॅव्हल्स क्रमांक-एमएच ४९ एटी ३०३० ही नागपूरवरून देसाईगंजकडे भरधाव वेगाने येत होती.अशातच ट्रॅव्हल्स पहिल्यांदा दुचाकीला व नंतर कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या हायवा ट्रक क्रमांक-एमएच ४० सीटी ५६९० ला जबरदस्त धडक दिली.धडक इतकी जोरदार होती की ट्रॅव्हल्स आणि हायवा ट्रकचा समोरील भाग चेंदामेंदा झाला.यात १५ प्रवाशी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर जखमींना ब्रम्हपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले.
जखमींची नावे👇
निशांत मेश्राम वय ३९ वर्षे, रा.मूल,कुणाल मडावी वय १६ वर्षे,रा.नागभीड,जितेंद्र गेडाम वय २६ वर्षे,रा. कुनघाडा,सचिन धोटे वय ३२ वर्षे,रा.नागपूर,गुड्डू धोंगडे वय ३७ वर्षे,रा.नागपूर,एकनाथ गजभिये वय ४० वर्षे, रा.चिमूर,छत्रीगसिंग बावणे वय ४५ वर्षे,रा.देसाईगंज -वडसा,रोहित नवलाखे वय २० वर्षे,रा. ब्रम्हपुरी,
अजमेर पठाण वय २२ वर्षे, रा.नागभीड,सुनंदा लोखंडे वय २९ वर्षे,रा.कुही,दीपिका मते वय २७ वर्षे,रा.देसाईगंज-वडसा,चंद्रकला धोटे वय ७० वर्षे,रा. नागपूर,कमलाबाई इंदूरकर वय ७८ वर्षे,रा.नागपूर, पवन कराडे वय ३२ वर्षे.रा.चिमूर,मुस्कान पठाण वय २५ वर्षे,नागभीड अशी जखमींची नावे आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!