Tuesday, September 22, 2026
Homeभंडाराइंस्टाग्रामवर औरंगजेबाचे समर्थन करणारी पोस्ट; भंडाऱ्यात तणाव..

इंस्टाग्रामवर औरंगजेबाचे समर्थन करणारी पोस्ट; भंडाऱ्यात तणाव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादाची धग कायम असतांनाच, भंडाऱ्यातही या प्रकरणामुळे मंगळवारी रात्री तणाव निर्माण झाला होता.एका तरुणाने आपल्या इंस्टाग्राम स्टेटसवर औरंगजेबचे समर्थन करणारी आणि हिंदू धर्माच्या भावना दुखावणारी पोस्ट शेअर केल्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करीत संबंधित तरुणावर कठोर कारवाईची मागणी करीत पोलिस ठाण्यात मोठ्या संख्येने धडक दिली.
भंडाऱ्यातील शोएब शेख याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्याशी संबंधित वादग्रस्त मजकूर पोस्ट केला.त्याने शिवाजी महाराजांच्या फोटोसह ‘बादशाह तो बोहोत सारे थे..!’ असा मजकूर लिहिला.तर त्याचबरोबर औरंगजेबाच्या फोटोखाली ‘लेकिन बाप एक ही था..!’ असे वादग्रस्त विधान केले.तसेच,दुसऱ्या स्टोरीमध्ये औरंगजेबाच्या प्रतिमेसमोर जमलेल्या लोकांचा फोटो टाकून त्यावर ‘ना सजा ना माफी,तुम्हारी सिस्टम फाडने के लिए सिर्फ हजरत औरंगजेब आलमगीर का नाम ही काफी’ असे गाणे जोडले होते.त्यानंतर ‘बाप ही बाप रहेगा’ हे वादग्रस्त गाणेही पोस्ट करण्यात आली.या प्रकारामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यावर धडक दिली.विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री प्रकाश उमाशंकर पांडे यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली.तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे,शोएब शेख याने सोशल मीडियाचा गैरवापर करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली.संतप्त कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे पोलिस ठाण्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शोएब शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!