Wednesday, August 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमोठी बातमी आता राज्यातील शाळांनाही लागू होणार सीबीएसई अभ्यासक्रम..

मोठी बातमी आता राज्यातील शाळांनाही लागू होणार सीबीएसई अभ्यासक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील शैक्षणीक गुणवत्ता सुधारावी तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील सातत्य आणि शैक्षणिक उत्कृष्टता राहावी,यासाठी राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना लवकरच सीबीएसई (CBSE-Central board of secondary Education-केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.महाराष्ट्र बोर्डाच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबतच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे.येत्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासूनच सीबीएससी अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असल्याची शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी विधान परीषदेत यासंदर्भात माहिती दिली.विधान परीषदेत विचारलेल्या प्रश्नाला मंत्री दादा भूसे यांनी लेखी उत्तर दिले.भाजप आमदार प्रसाद लाड यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली का?असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता.सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.१ एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्यात येणार,असल्याची माहिती देण्यात आली.शाळांचे वर्षभराचे वेळापत्रक यंदा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये शिक्षण विभागाकडून अचानक पहिल्या इयत्तेपासून नवव्या इयत्तेपर्यंतची वार्षिक परीक्षा एप्रिलअखेरीस घेण्याची सूचना जारी केली.मात्र या सुचनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच धांदल उडाली आहे.या परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच व्हाव्यात,अशी शिक्षकांसह पालकांची मागणी आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) हे भारतातील एक राष्ट्रीय शिक्षण मंडळ आहे जे संलग्न शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि मानके निश्चित करण्यासाठी जबाबदार आहे.CBSE चे उद्दिष्ट देशभरात एकसमान शिक्षण प्रणाली प्रदान करणे आहे,ज्यामुळे अध्यापन आणि शिक्षणात सातत्य आणि गुणवत्ता सुनिश्चित होते.त्याचे ध्येय संरचित अभ्यासक्रम आणि नियमित मूल्यांकनाद्वारे शैक्षणिक उत्कृष्टता आणि समग्र विकासाला प्रोत्साहन देणे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!