Wednesday, August 26, 2026
Homeआरमोरीअनियंत्रित दुचाकी बसला जाऊन धडकली; दुचाकीस्वाराचा मृत्यू..

अनियंत्रित दुचाकी बसला जाऊन धडकली; दुचाकीस्वाराचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-वळण मार्गावर अनियंत्रित झालेली दुचाकी बसला जाऊन धडकल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, शुक्रवार २४ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास आरमोरी तालुक्याच्या वैरागड ते ठाणेगाव वळण मार्गावर घडली.कर्मवीर भूरसे वय ५० वर्षे, रा.ठाणेगाव, ता.आरमोरी,जि.गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या इसमाचे नाव असून ते काही कामानिमित्त वैरागडला होते.दरम्यान,गावाकडे परत येत असतांनाच सदरचा अपघात घडला.
कर्मवीर भूरसे हे त्यांच्या दुचाकीने एकटेच वैरागडला गेले होते.तेथील कामे आटोपून सायंकाळच्या सुमारास दुचाकीने ठाणेगावला येण्यासाठी निघाले असता वैरागड ते ठाणेगाव वळण मार्गावर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याचवेळेस समोरून येणाऱ्या बसला दुचाकी जाऊन धडकली.यात कर्मवीर भूरसे हे मुख्य मार्गावरच कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.दरम्यान,मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी मदतकार्य सुरू केले,पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अपघाताची माहिती आरमोरी पोलीस प्रशासनास देण्यात आली असून पुढील प्रक्रिया पार पाडणे सुरू होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!