Thursday, July 9, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांची आज आरमोरी व देसाईगंज उपविभाला भेट.. - देसाईगंजच्या शिवराजपूर येथील...

गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांची आज आरमोरी व देसाईगंज उपविभाला भेट.. – देसाईगंजच्या शिवराजपूर येथील पांदण रस्त्याची पाहणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आरमोरी व देसाईगंज शहरातील विकास कामे लोकाभिमुख पद्धतीने,गुणवत्तेला प्राधान्य देत व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.जिल्ह्यातील नागरी विकास कामांना गती देण्यासाठी आरमोरी व देसाईगंज(वडसा)शहरातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी आज,शुक्रवार २४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांनी केली.आरमोरी शहराच्या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद येथे विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसेणजित प्रधान, तहसीलदार उषा चौधरी,मुख्याधिकारी प्रितीश मगरे, नगराध्यक्ष रुपेश पुणेकर व नगरपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर त्यांनी शहरातील रामसागर तलावाच्या सौंदर्यीकरणासंदर्भात तसेच तालुका क्रीडा संकुल परिसर विकसित करण्यासाठी प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.नगर परिषद क्षेत्रातील महसूल विभागाच्या जागा विविध विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने सविस्तर प्रस्ताव सादर करावेत,तसेच नगर परिषद प्रशासकीय इमारतीसाठी नियोजनबद्ध प्रस्ताव तयार करावा,असे निर्देश त्यांनी दिले.
शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम विहीत कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे व गुणवत्तेची तडजोड होणार नाही याची दक्षता घ्यावी,असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,देसाईगंज(वडसा)तालुक्यातील शिवराजपूर येथे जिल्हाधिकारी यांनी पांदन रस्त्याची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेबाबत आवश्यक सूचना दिल्या.तसेच आयोजित रक्तदान शिबिराला भेट देत सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.प्रभारी तहसीलदार एन.टी.कुमरे उपस्थित होते.यावेळी प्रशासनातील व विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

आता गावातील स्मशानभूमीचा दाखल द्या अन् विविध योजनेचा निधी मिळवा.. – ग्रामीण भागात तब्बल ७ हजार ४४४ गावांमध्ये स्मशानभूमीच नाही..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागात आजही तब्बल ७ हजार ४४४ म्हणजेच जवळपास २० टक्के गावांमध्ये स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना मरणयातना सहन कराव्या...

लॉजमध्येच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-नुकतेच चार दिवसांपूर्वी वर्धा शहराच्या कारला रोडलगत असलेल्या वैष्णवी कॉम्पलेक्स जवळील नखाते लेआऊट परिसरात स्वतःच्याच घरी देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी रंगेहाथ अटक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!