Monday, May 25, 2026
Homeदेसाईगंज'हर घर तिरंगा' उपक्रमाअंतर्गत देसाईगंज नगर परिषद तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन..

‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत देसाईगंज नगर परिषद तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत तिरंगा रांगोळी स्पर्धा,तिरंगा राखी बनवणे स्पर्धा, तिरंग्यावर आधारित,चित्रकला स्पर्धा,प्रश्नमंजुषा,वक्तृत्व स्पर्धा,तिरंगा रॅली,हर घर तिरंगा,घर घर तिरंगा जनजागृती उपक्रम,तिरंगा बाईक रॅली,तिरंगा प्रतिज्ञा ईत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत शासन निर्देश प्राप्त झाले आहेत.त्याचाच एक भाग म्हणून देसाईगंज नगर परिषद कार्यालय येथे मुख्याधिकारी नंदकिशोर कुंभरे यांचे नेतृत्वात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्वानिमीत्य हूतात्मा स्मारक येथे उभारण्यात आलेल्या शिलाफलकासमोर तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली.तसेच नगर परिषद प्राथमिक शाळेतील सर्व मुख्याध्यापक यांच्या नेतृत्वाखाली व सर्व शिक्षकांच्या सक्रिय सहकार्याने  तिरंगा रांगोळी स्पर्धा,तिरंगा राखी बनवणे स्पर्धा, तिरंग्यावर आधारित चित्रकला स्पर्धा,प्रश्नमंजुषा, स्वच्छता अभियान ईत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रशासकिय अधिकारी प्रमोद येरणे,लेखापाल अविनाश राठोड,स्थापत्य अभियंता सौरभ नंदनवार, निशांत घोनमोडे,रचना सहाय्यक दिव्या परतेके,,कर विभाग प्रमुख स्वप्नील हमाने,कर व प्रशासकिय अधिकारी प्रफुल हटवार,अग्निशमन अधिकारी अनिल गोवर्धन,संगणक अभियंता प्रशांत चिचघरे,विद्यूत अभियंता योगीता निंबार्ते, केंद्र प्रमुख ए.एस.आमनार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे,शहर समन्वयक प्रफुल दुफारे,स्थापत्य अभियंता प्रधानमंत्री आवास योजना विलास बोंद्रे,से.नि.हरगोविंद भुर्रे, हमीद पठाण,लिपीक रितेश येरणे,दिनकर खेत्रे,अनिता राजगूरु,सारीका दुबे,वैशाली कुमरे,लिडींग फायरमन राजु निंबेकर,सफाई जमादार जवाहर सोनेकर,मुकेश सोनेकर,समुदाय संघटक अरुण मोटघरे  ईतर  अधिकारी व कर्मचारी  व नगर परिषद शाळांचे  शिक्षकवृंद डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनीक वाचनालयाचे विद्यार्थी, पोलिस विभाग तसेच बचत गटांच्या महिला सदस्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.
नागरीकांसाठी नगर  परिषद कार्यालयात तिरंगा झेंडा विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे.ज्या नागरीकांना तिरंगा आवश्यक आहे, त्यांनी नगर परिषद कार्यालयातून तिरंगा खरेदी करुन आपल्या घरांवर फडकवावा,असे आवाहन मुख्याधिकारी नंदकिशोर कुंभरे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!