Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरसामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तथा बालरोग तज्ज्ञ डॉ.अभिलाषा गावतुरे(बेहरे)यांनी गुंजेवाही गावात पोहचून मुख्य वनसंरक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना उघड आव्हान देत,सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल,तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो, सर्वसामान्य नागरिकांचा जीव जातो,पण अधिकारी वातानुकूलित कार्यालयात बसून फक्त आर्थिक मदतीची घोषणा करतात.त्यांना या मृत्यूचे दुःख होत नाही.जर सामान्य माणसाच्या जीवाची किंमत २५ लाख असेल,तर अधिकाऱ्यांनीही स्वतःला त्या परिस्थितीत उभे करावे. वनविभाग मृतांच्या कुटुंबीयांना १५ लाख आणि १० लाख अशा टप्प्यांत मदत देतो.आम्ही मात्र थेट २५ लाखांचा चेक देण्यास तयार आहोत.पण,त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः वाघाच्या जबड्यात जाण्याची तयारी दाखवावी,अश्या कडक शब्दांत वनविभागाच्या धोरणांवर हल्लाबोल केला.
गुंजेवाही येथील नागरिकांशी संवाद साधतांना डॉ. गावतुरे म्हणाल्या की,मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटना अनेक वर्षापासून सुरू आहेत.कधी आईसमोरून लेकरू उचलले जाते,कधी काकाच्या मांडीवरून मुलाला वाघ घेऊन जातो,तर कधी शेतात काम करणाऱ्या महिलांचा बळी जातो.या घटना आता विदर्भातील ग्रामीण भागासाठी रोजचे वास्तव बनले आहे.यापूर्वीही या परिसरात तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता आणि आता पुन्हा चार महिलांना जीव गमवावा लागला.या महिला कोणाची तरी आई,पत्नी,बहीण होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर वनविभाग २५ लाखांची मदत जाहीर करून आपली जबाबदारी संपल्यासारखे वागतो.पण,या घटना रोखण्यासाठी वनविभागाकडून ठोस उपाययोजना कां केल्या जात नाहीत? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!