Monday, July 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तरोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या 'व्हीबी-जी राम जी' योजनेत १२५ दिवस...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता ‘विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका मिशन-ग्रामीण’ म्हणजेच ‘व्हीबी-जी राम जी’ योजना कायदा घेणार आहे.या नवीन कायद्यानुसार आता प्रत्येक ग्रामीण भागातील कुटुंबाला वर्षातून १२५ दिवस काम देण्याची हमी मिळेल,जी यापूर्वी १०० दिवस होती.यामुळे गावांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना अधिक काम मिळेल आणि त्यांची आर्थिक सुरक्षा मजबूत होणार आहे; असे सरकारचे म्हणणे आहे.पण,काहींच्या मते,इकडे १०० दिवसांचेच काम मिळत नाही अन् सरकार म्हणते दीडशे दिवस.सदरचा नवीन कायदा हा येत्या,बुधवार १ जुलै २०२६ पासून देशभरात लागू केला जाणार आहे.तत्पूर्वी ‘व्हीबी-जी राम जी’ कायद्याचे मसुदा नियम जारी करण्यात आले असून केंद्र सरकारने यावर जनता तसेच संस्थांकडून सूचना मागवल्या आहेत.मसुदा नियमांमध्ये रोजगार हमी योजनामधून व्हीबी-जी राम जी मध्ये बदलाची प्रक्रियादेखील स्पष्ट केली आहे.व्हीबी-जी राम जी ही नवीन ग्रामीण रोजगार हमी योजना असेल,जी सध्याच्या रोजगार हमीची जागा घेईल.बदलाच्या काळात सुरू असलेली कामे थांबणार नाहीत. कायद्याच्या कलम २२ नुसार या योजनेचा खर्च केंद्र आणि राज्य सरकारे मिळून उचलतील.सामान्य राज्यांमध्ये खर्चाची विभागणी ६० टक्के केंद्र आणि ४० टक्के राज्य यांच्यात होईल. जुन्या बिलांचे पेमेंट केले जाईल.आवश्यक नोंदी नवीन प्रणालीमध्ये हस्तांतरित केल्या जातील.ई-केवायसीद्वारे पडताळणी केल्यानंतर जॉब कार्डदेखील वैध ठरवले जातील.जोपर्यंत राज्ये नवीन योजना लागू करण्याची अधिसूचना जारी करत नाहीत,तोपर्यंत मजुरांचे सध्याचे अधिकारदेखील सुरू राहतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!